BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील भिलवडी , माळवाडी व नागठाणे येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा शुभारंभ..





पलूस तालुक्यातील भिलवडी , माळवाडी व नागठाणे येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा शुभारंभ..                           


=====================================


======================================

भिलवडी | दि. 01 जुलै 2022

दिव्यांगांना हक्काचे अनुदान व शासकीय लाभ मिळवण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागत असतो. शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवण्यासाठी संघटन आवश्यक आहे या दृष्टीने  दिव्यांगाच्या हक्कासाठी कायम लढा देत असलेल्या आणि बच्चु भाऊ कडू यांचे मोठे योगदान असलेल्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या शाखेंचे उद्घाटन पलूस तालुक्यातील भिलवडी , माळवाडी , नागठाणे या तीन गावांमध्ये नुकतेच पार पडले. 



यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी, जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर, जिल्हा सचिव सुरेश गायकवाड, जिल्हा समन्वयक दिलीप जाधव , पलुस तालुका अध्यक्ष संजय चौगुले, पलुस तालुका सचिव लखन माळी यांच्या उपस्थितीत  भिलवडी , माळवाडी ,नागठाणे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच व सदस्य यांच्या  हस्ते नामफलकाचे अनावरण करून व श्रीफळ वाढवून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा शुभारंभ करण्यात आला.



 या दरम्यान संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भिलवडी , माळवाडी व नागठाणे या तिन्ही गावातील दिव्यांग बांधवांच्यासह पलूस तालुक्याचे तहसीलदार आणि पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन दिव्यांगांना तालुक्यात येणाऱ्या अडचणी व ग्रामपंचायत पाच टक्के निधी संदर्भात चर्चा केली. 
यावेळी प्रहारचे भिलवडी माळवाडी, नागठाणे, गावचे दिव्यांग पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆●




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆