BANNER

The Janshakti News

जातीयवादी समाजकंटक रेल्वे कर्मचारी अनुपम नरेंद्र कुमार याला भारतीय रेल प्रशासनातून बडतर्फ करा :- अविराज काळीबाग..



जातीयवादी समाजकंटक रेल्वे कर्मचारी अनुपम नरेंद्र कुमार याला भारतीय रेल प्रशासनातून बडतर्फ करा :- अविराज काळीबाग..

======================================


======================================

कुंडल | दि. 30 जून 2022

 विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर मोबाईल स्टेटसवरून प्रसिद्ध केले प्रकरणी, भवानीनगर रेल्वे स्टेशन ता. वाळवा येथे ट्रॅकमन पदावर कार्यरत असलेला, मूळचा बिहार राज्यातील असलेला व सध्या ताकारी ता. वाळवा जि. सांगली येथे राहण्यास असलेल्या अनुपम नरेंद्र कुमार या जातीयवादी मानसिकतेने भरकटलेल्या व्यक्तीवर दि. 28 जून 2022 रोजी इस्लामपूर पोलीसात आरपीआयचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी अनुपम नरेंद्र कुमार याला इस्लामपूर पोलीसांनी अटक करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला दि. 29 रोजी इस्लामपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तेंव्हा सध्या आरोपी अनुपम कुमार याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे.
   
        
      सदर घटनेच्या अनुषंगाने दि. 30 जून 2022 रोजी पलूस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पक्षाचे वतीने किर्लोस्कर वाडी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधकाना, निवेदन देऊन समाजकंटक जातीयवादी आरोपी अनुपम नरेंद्र कुमार याला तत्काळपणे भारतीय रेल सेवा प्रशासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
    
      
  जातीयवादी आरोपी अनुपम नरेंद्र कुमार याच्यावर भारतीय रेल सेवा प्रशासना कडून तत्काळपणे बडतर्फची कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे वतीने दि. 7 जुलै 2022 रोजी किर्लोस्करवाडी ता. पलूस येथे आरपीआय (आठवले) पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस मा. सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तसेच आरपीआय (आठवले) युवक आघाडी पक्षाचे तालुकाध्यक्ष मा. अविराज काळीबाग यांच्या नेतृत्वाखाली व आरपीआय (आठवले) पक्षाचे पलूस तालुका कार्याध्यक्ष मा. अमरजीत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदन म्हटले आहे.


              यावेळी पलूस तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष मा. अविराज काळीबाग, पैलवान अजित गुजले, मनोज जाधव, रोहित घाडगे, पारस जावीर, आकाश वाघावडर, विश्वजीत चव्हाण आदी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆