BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल शाळेत, जागतिक योग दिन, उत्साहात साजरा..भिलवडी शिक्षण संस्थेच्या, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल शाळेत, जागतिक योग दिन, उत्साहात साजरा..

======================================


======================================भिलवडी | दि. 21/06/2022

भिलवडी शिक्षण संस्थेच्या, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल शाळेत, जागतिक योग दिन, उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये
योगासने आणि प्राणायाम यांचे महत्व या विषयावर श्री सुबोध वाळवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


योग व प्राणायाम यांचा  आपल्या शरीरावर होणारा परिणाम त्यांनी उत्तम प्रकारे समजून सांगितला. आपले शरीर हे पृथ्वी, वायू , जल, अग्नी व आकाश या पाच तत्वांनी बनलेले आहे, या तत्त्वांची माहिती सांगुन त्यांचा  आपल्या शरीरासाठी होणारा  उपयोग सांगितला. 


ओमकार या प्राणायाम प्रकाराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. किर्ती चोपडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री. ऐतवडे सरांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कू. विद्या टोणपे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार सौ. उज्वला हजारे यांनी मानले.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆