BANNER

The Janshakti News

पलूस शहरास बायपास रस्ता करा अन्यथा.. "खळखट्याक" आंदोलन करणार - मनसे



पलूस शहरास बायपास रस्ता करा अन्यथा.. "खळखट्याक" आंदोलन करणार - मनसे

======================================


======================================

पलूस | दि.23/06/2022

पलूस शहरांमध्ये सध्या असणारा बाजार पेठ रस्ता हा वाहतूक कोंडी व गर्दीमुळे अपुरा पडत आहे. ऊस वाहतुकीमुळे व रस्त्यावर असणाऱ्या पार्किंगमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याला पर्यायी बायपास रस्ता करणे ही पलूसकरांची खूप दिवसांपासूनची मागणी असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन बायपास रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे.

सदर बायपास रस्त्यामुळे पलूस शहरात सध्या होणारी अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गाने होईल. अवजड वाहतूक मुळे होणारे अपघात ही थांबतील. सदर बायपास रस्त्याच्या दुतर्फा नवीन बाजारपेठ निर्माण होऊन स्थानिक पलूस शहरातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल.

घोटीकर डॉक्टर दवाखाना ते सुगम वाईन शॉप येथील जमीन मालकांनी अटी व शर्ती घालून त्यांच्या मालकीची जमीनीतून काही जमीन मालकांनी ४० फूट तर काहींनी २० फूट रस्ता करणेसाठी प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय चर्चेतून लेखी निवेदन सन २०१९ मध्ये दिले आहे.


तरी सदर बायपास रस्ता करून पलूस शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करण्यात यावे. सदर रस्ता झाल्यामुळे ऊस वाहतुकीचे व पार्किंगचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. पलूसच्या विकासासाठी व रस्त्यालगत असणार्‍या लोकवस्तीला हा रस्ता वापरात आणणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण हा रस्ता आपल्या कार्यालयाकडे नोंद करून घेण्यात यावा व पलूस शहराचा बायपास रस्त्याचा प्रश्‍न कायमचा सोडवावा. यासंदर्भात आपण केलेल्या कार्यवाहीचा तपशील आम्हाला येत्या आठ दिवसात देण्यात यावे अन्यथा वाहतुकीचा प्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी आपल्या कार्यालयात २९ जून २०२२ रोजी मनसे स्टाईल "खळखट्याक" आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पलूस तालुका अध्यक्ष सागर सुतार व सांगली जिल्हा सचिव संग्राम थोरबोले यांनी निवेदनाद्वारे पलूसचे प्रशासक सुमित जाधव यांना दिला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆