BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल चे एस. एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल चे  एस. एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..

======================================


======================================

भिलवडी | दि. 21/06/2022

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेचा मार्च २२ मध्ये झालेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला.  १००% निकालाची परंपरा सलग ८ वर्ष अखंडित राखली आहे. 


कु. आरती  भास्कर बाबर हिने ९८.४०% गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.  तर  


कु. वैष्णवी शशिकांत हजारे हिने   ९७.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. 


कु. ईश्वरी अभय सकळे हिने  ९६.६०% टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळविला. 

तसेच ९ विद्यार्थ्यांना ९०%च्या वरती  गुण प्राप्त झाले आहेत. तसेच गणित या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून आरती  भास्कर बाबर हिने शाळेचे नाव उज्ज्वल केले . सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले.  एकूण २६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे  व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भिलवडी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆