BANNER

The Janshakti News

आदिवासी पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन करणार - सुधाकर वायदंडे यांचा इशाराआदिवासी पारधी समाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी
 आंदोलन करणार - सुधाकर वायदंडे यांचा इशारा 

====================================
==============================

शिराळा | दि. 26 / 04 / 2022

आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसना बाबत कोणतीही ठोस अंलबजावणी न झालेस दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा दलित महासंघ युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
          पारधी पुनर्वसनाबाबत दलित महासंघाच्या शिष्टमंडळासोबत तहसिल कार्यालयात बैठक पार पडली यावेळी तहसीलदार श्री गणेश शिंदे, दलित महासंघाचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे शिराळा पोलिस ठाण्याचे पो.निरीक्षक श्री.सुरेश चिल्लावर उपस्थित होते.श्री शिंदे यांनी तत्काळ गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
           सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या वतीने प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी पुनर्वसनासाठी गेली  20 वर्ष महाराष्ट्रभर लढा चालू आहे परंतु वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पारधी समाजाचे पुनर्वसन रखडले आहे राज्यभर पारधी पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना होत असताना शिराळा व वाळवा तालुक्यातील पारधी समाज सर्व योजनांपासून वंचित राहिला आहे. 
        वायदंडे म्हणाले,ज्या लोकांना गावे दिलेली आहेत त्या लोकांना अद्यापही घरकुलाचा किंवा इतर कोणताही लाभ मिळालेला नाही. अजूनही काही लोक उघड्यावर राहत आहेत अशा लोकांचे गावामध्ये पुनर्वसन नाही. प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.परिणामी पारध्यांना गावातून हाकलण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी पारधी पुनर्वसनाकडे  प्रशासनाने गांभीर्याने पाहून ठोस अमलबजावणी करण्याची गरज आहे.
            म्हणून पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसनासाठी ठोस अंलबजावणी करून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
           निवेदनावर सुधाकर वायदंडे,पोपटराव लोंढे,दिनकर नांगरे,वैभव शिंदे,टारझन पवार,दीपक पवार,राकेश काळे,रोशना पवार,जहांगीर पवार,धर्मेंद्र काळे,गणेश पवार यांच्या सह्या आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆