BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील नागठाणे येथे शब्दांगण व्याख्यानमाला व कविसंमेलना सह विविध कार्यक्रम संपन्न.. नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..



पलूस तालुक्यातील नागठाणे येथे शब्दांगण व्याख्यानमाला व  कविसंमेलना सह विविध कार्यक्रम संपन्न..

नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

=====================================
=====================================

भिलवडी | दि. 27 / 04/2022

पलूस तालुक्यातील नागठाणे येथे सार्वजनिक मोफत वाचनालय व नागठाणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शब्दांगण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले हे शब्दांकन व्याख्यानमालेचे सतरावे वर्ष आहे. जिल्हा परिषद शाळा पटांगण नागठाणे येथे सलग दोन दिवस दिनांक २४ आणि २५ एप्रिल रोजी दररोज सायंकाळी  आठ वाजता कार्यक्रमांचे आयोजन केले होते
       रविवारी दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता शाळेच्या पटांगणावर कवी संमेलन संपन्न झाले या कवी संमेलनासाठी आबा पाटील मंगसुळी जिल्हा बेळगाव, अनिल दिक्षित पुणे, इंद्रजित घुले मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, शिवाजी बंडगर सांगोला, प्रा संतोष काळे पलूस, नागठाणे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला या सर्व निमंत्रित कवींचे कवितांचे संमेलन संपन्न . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष भिकाजी साळुंखे पाटील होते या कार्यक्रमासाठी अनेक साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले होते श्रीपाद देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला आभार सनी लटके यांनी मानले
     सोमवार दि. २५ एप्रिल रोजी  सायंकाळी  आठ वाजता शाळेच्या पटांगणावर पाटोदा, जिल्हा अहमदनगर गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे- पाटील यांचे व्याख्यान  झाले गावच्या सरपंच सौ. वृषाली प्रशांत पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यानिमित्त गौस मोहम्मद लांडगे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले आनंदराव कोरे लक्ष्मण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला या निमित्ताने खेळ पैठणीच्या कार्यक्रमांतर्गत पंचवीस पैठणी साड्या प्रधान करून हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम ग्रामपंचायत आणि वाचनालयाच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य वाचनालयाचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामस्थ महिला ग्रंथपाल उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆