BANNER

The Janshakti News

ब्रम्हनाळ सोसायटी निवडणूकीत सत्ताधाऱ्यांची हॅटट्रिक..ब्रम्हनाळ सोसायटी निवडणूकीत सत्ताधाऱ्यांची हॅटट्रिक..

======================================


======================================

वसगडे | दि. १६ एप्रिल २०२२

       ब्रम्हनाळ तालुका पलूस येथील सर्व सेवा विकास सोसायटी निवडणूकीत सत्ताधाऱ्यांनी एकहाती सत्ता मिळवत हॅटट्रिक साधली. चुरशीच्या निवडणूकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलने विरोधी गटाचा मोठया फरकाने पराभव केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, माजी सरपंच अशोक पाटील, सरपंच उत्तम बंडगर, सुभाष वडेर, मोहन शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनेलने ही निवडणूक लढवली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गावातील सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी गट-तट विसरून कसोशीने प्रयत्न केले होते परंतु संधीसाधू लोकांनी आडकाठी आणली  व ही निवडणूक चुरशीची होणार असे चित्र निर्माण केले  परंतु मतदारांनी त्यांना साफ नाकारले व आपल्या मताचा कौल हा सत्ताधारी पॅनेलला दिला.


         सत्ताधारी पॅनेलचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले. यापैकी पाच जणांना बिनविरोध निवडूण येण्याची संधी मिळाली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे अनिल राजोबा, सुरेश मद्वाण्णा, सुभाष वडेर, विजय शिंदे, मोहन शिनगारे, सुहास पाटील, आकाराम गावडे, तुकाराम बंडगर, आनंदा कारंडे, शहानीबाई मोळाज, राजमती वडेर, हणमंत विभुते, दत्तात्रय गडदे. सत्ताधारी पॅनेल निवडूण येण्यासाठी शिवाजी गडदे ( नाना ), भुपाल कर्नाळे, प्रकाश चौगुले, सहदेव कारंडे, शितल लोटे, मिलिंद शिंदे, हेमंत जगदाळे, भाऊसो वडेर, संजय पाटील, अंकुश गावडे सागर गडदे सचिन पाटील यांनी प्रयत्न केले. तसेच प निकालानंतर शेतकरी विकास पॅनलच्या प्रमुखांनी , निवडून आलेल्या उमेदवारांनी व उत्साही कार्यकर्ते यांनी प्रमुख मार्गावरून फेरी काढून मतदारांचे व नागरिकांचे आभार मानले.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●