BANNER

The Janshakti News

हनुमान जयंती निमित्त धनगांव येथे भरगच्च कार्यक्रम..हनुमान जयंती निमित्त धनगांव येथे भरगच्च कार्यक्रम..

=====================================
=====================================

भिलवडी | दि. १५ एप्रिल २०२२

धनगांव ता.पलुस गावचे ग्रामदैवत हनुमान जयंती उत्सवानिमित्त भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.१६ रोजी पहाटे ५ वा. ह.भ. प. पोपट माने महाराज यांचे कीर्तन, सूर्योदय समयी हनुमान जन्मकाळ कार्यक्रम होईल.सायंकाळी ५ वा.सवाद्य पालखी मिरवणूक,सायंकाळी ७ वा.महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.रविवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ९ वा.भव्य बैलगाडी शर्यत,दुपारी १२ वा.रिव्हर्स रिक्षा स्पर्धा,दुपारी ३ वा.म्हैस धावणे स्पर्धा,सायंकाळी ४ वा.रेडकू धावणे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.सोमवार दि.१८ रोजी रात्री ठीक ९ वा. जयहनुमान नाटय मंडळ प्रस्तुत महादेव कोळेकर लिखित रक्तात न्हाल सौभाग्य या नाटकाचा प्रयोग,मंगळवार दि.१९ रोजी रात्रौ ९ वा.अशोकराव भोसले धोंडेवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा,शुक्रवार दि.२२ रोजी रात्रौ ९ वा.रजनी गोरड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धमाका कार्यक्रम संपन्न होणार आहे.हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●