BANNER

The Janshakti News

दलित महासंघ लवकरच राजकीय भूमिका घेणार - प्रा.मधुकर वायदंडे यांची घोषणा...दलित महासंघ लवकरच राजकीय भूमिका घेणार - प्रा.मधुकर वायदंडे यांची घोषणा...

--------------------------------------------------------------------
------------------------------------------------------

शिराळा | दि. 07 / 03 / 2022

        दलित महासंघ ही गेली 30 वर्षांपासून सामाजिक चळवळीत काम  करणारी संघटना असून समाजाच्या हितासाठी लवकरच समविचारी पक्षासोबत चर्चा करून  राजकीय भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांनी केले. 


             ते शिराळा येथील नागमणी या शासकीय विश्रामगृहावर दलित महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
        प्रा.मधुकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या माध्यमातून अनेक अन्याय अत्याचाराला वाचा फोडून लोकांना न्याय मिळवून देणे,शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना मिळवून देणे,दलित,आदिवासी पारधी समाज्याच्या पुनर्वसनासाठी तसेच प्रत्येक गावामध्ये समाजासाठी समाज मंदिर व स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यासाठी लढा उभा करणार आहे.
     अनेक सामाजिक प्रश्नासाठी मोर्चे,आंदोलने करून समाजाच्या प्रबोधनासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत.या चळवळीच्या माध्यमातून संघटना तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम झालेलं आहे. 


        दलित,आदिवासी,वंचित,पीडित,
अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक चळवळीला राजकीय ताकदीची गरज आहे यासाठी लवकरच दलित महासंघाची राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रा.वायदंडे यांनी सांगितले.
              या बैठकीला शिराळा पं.स चे उपसभापती बाळासाहेब नायकवडी प्रमुख उपस्थित होते.
          यावेळी दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, प.महा.कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे,युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे,प.महा निरीक्षक अनिल आवळे,जि.कार्याध्यक्ष नागनाथ घाडगे,जि.संघटक दिनकर नांगरे,नारायण वायदंडे,मोहन बाबर यांच्यसह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्तविक युवक जिल्हाध्यक्ष राज लोखंडे यांनी तर आभार युवक तालुकाध्यक्ष सत्कार गायकवाड यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆