BANNER

The Janshakti News

मिरज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचा धूमधडाका...मिरज तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या शाखांचा धूमधडाका...

--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------

सांगली :
दि. ७ मार्च २०२२

"गाव तेथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता" या ध्येय धोरणास अनुसरून वंचित बहुजन आघाडी मिरज तालुक्यातील इनामधामणी, मोहन नगर, एरंडोली या गावात ग्रामशाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले, येणाऱ्या काळात गावातील प्रत्येक घरात वंचित बहुजन आघाडीचा विचार पोहचवा. येणाऱ्या काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवा. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत वंचित बहुजन समाजाच्या हातात सत्तेच्या चाव्या द्यायच्या या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. 


शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा महासचिव (दक्षिण) उमरफारूक ककमरी, जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष संजय अशोक कांबळे,वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, अनिल मोरे, विशाल धेंडे, परशुराम कांबळे यासह नवनियुक्त सर्व शाखेचे शाखा अध्यक्ष, सचिव यांच्या बरोबरच शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

                  --------विजयनगर शाखा-------

                  -------इनामधामणी शाखा-------

                     --------एरंडोली शाखा-------
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆