BANNER

The Janshakti News

अल्लाबक्ष गडेकरी यांची सांगली शहर जिल्हा अध्यक्ष कामगार सेल पदी निवड... अल्लाबक्ष गडेकरी यांची सांगली शहर जिल्हा अध्यक्ष कामगार सेल पदी निवड..

=====================================


=====================================

सांगली | ता. ०५ / ०३ / २०२२

 राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांचे आदेशानुसार व जिल्ह्याचे नेते मा. श्री. जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा अध्यक्ष मा. राहुलजी पवार यांचे पत्राने    अल्लाबक्ष गडेकरी यांची   नियुक्ती करण्यात आली. 
सदर कार्यक्रमात बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले बांधकाम कामगारांच्या हिताचे आणि त्यांच्या योजनेचे महत्त्व कामगारांना  समजाविण्यात आले.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रतीकदादा पाटील यांनी आपल्या भाषणात कामगारांची उपस्थिती पाहून अल्लाबक्ष गडेकरी यांची स्तुती केली आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या मा  राहुल पवार यांनी आपल्या भाषणात मा अझमभाई काझी यांचे पक्षाला अल्लाबक्ष गडेकरी यांच्यासारखा हीरा दिला असे संबोधून त्यांचे आभार मानले तसेच मा संजय बजाज यांनी सर्व कामगारांना नवीन योजनेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती केली सदर कार्यक्रमास एक हजाराहून जास्त कामगार उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासारखी होती सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मा प्रतिक दादा पाटील  मा. मा संजय बजाज शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,मा राहुलदादा पवार शहर  जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस मा बाळासाहेब पाटील जिल्हा सरचिटणीस,मा सुभाषभाऊ सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष इस्लामपूर, नगरपरिषद ,मा मैनुद्दीन बागवान गटनेते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका,मा विनायक हेगडे राष्ट्रवादी कामगार सेल,मा अभिजीत हारगे मिरज शहर राष्ट्रवादी अध्यक्ष,मा आझमभाई काझी युवा नेते, मा योगेंद्र थोरात नगरसेवक ,मा अतहर नाईकवाडी नगरसेवक,मा रजिया काझि नगरसेवक, मा संगीता हारगे नगरसेवक,मा नर्गिस सय्यद नगरसेविका,मा मालन हुलवान नगरसेविका
आणि कामगार आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलावरभाई शमनजी

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆