BANNER

The Janshakti News

रामोशी समाज बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. अन्यथा 22 मार्चपासून तीव्र आंदोलन करू.... दौलत नाना शितोळे यांचा इशारा...रामोशी समाज बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. अन्यथा 22 मार्चपासून तीव्र आंदोलन करू....

दौलत नाना शितोळे यांचा इशारा...

------------------------------------------------------------------


------------------------------------------------------------------ 

जत | ता.१४ / ०३ / २०२२

 जत तालुक्यातील मुचंडी येथील ढाबा जळीत प्रकरणात तोळबोळ वाडी येथील रामोशी समाजातील चार बांधवांवर व पाटील समाजातील दोन बांधवांवर ढाबा पेटवण्याचा खोटा आरोप करून जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते चौकशीअंती तातडीने मागे घेण्यात यावेत अन्यथा 22 मार्च पासून सांगली जिल्हाधिकारी कचेरी व आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी आज जत तहशील कचेरीवरील समाजाच्या मोर्चासमोर दिला. यावेळी संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येने रामोशी-बेरड समाज बांधव उपस्थित होते. जत पोलिस ठाण्यात मुचंडी येथील ढाबा जळीत प्रकरणासंदर्भात रामोशी समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज जत तहसील कार्यालयावर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटने चे ज्येष्ठ नेते आनंदराव जाधव,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव,राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्य नेते अंगद जाधव, सीबीएस न्यूज चॅनेलचे संपादक राजाभाऊ गुजले, जय मल्हार क्रांती संघटनचे  जिल्हाध्यक्ष पै.पिनू मंडले, ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, रामोशी-बेरड सेवा समितीचे प्रकाश नाईक,युवा नेते रोहीत मलमे, तसेच संघटनेचे मुंबई शाखेचे प्रतिनिधी संजय मंडले, पलूस नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल खाशाबा दळवी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुका अध्यक्ष रमेश पाटील,महिला प्रतिनिधी कल्पना मलमे,कोमल चव्हाण,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून रामोशी समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालावे आणि समाजावरील अन्याय दूर करावा अन्यथा या पुढील काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल असा इशारा दिला. या मोर्चास सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर मुंबई आदी जिल्ह्यातून विविध कार्यकर्ते,समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्केट कमिटी जत पासून सुरू झालेल्या या मोर्चात दाखल खोटे गुन्हे मागे घ्या.रामोशी समाजावरील अन्याय अत्याचार बंद करा अशा घोषणांनी आज जत शहर दणाणून सोडले. मार्केट कमिटी,संभाजी चौक आरळी नाका या मार्गाने तहसील कार्यालयावर  आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.जत चे तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस खात्याचे अधिकारी मोहिते यांनी समक्ष मोर्चा समोर येऊन मोर्चाचे निवेदन स्वीकारले. जत तालुक्यात प्रथमच रामोशी बेरड समाजाच्या मोर्चाने तालुक्यातील वातावरण उत्साही व आनंदी बनल्याचे दिसून आले. 

याप्रसंगी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्हा नोंदीतील रिमांड यादीमधील तारीख वेळ घटना यात खाडाखोड आणि विसंगती दिसत असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आदेश व्हावेत. ढाबा जळीत प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआय मार्फत करून  खऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी. ढाब्यासंबंधी संपूर्ण माहिती तहसीलदार कार्यालयाकडून करुन त्याचा स्वतंत्र चौकशी अहवाल संघटनेस मिळावा. यात अडकवण्यात आलेल्या मालतेश मलमे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला परीक्षेचा पेपर देण्यास मज्जाव करण्यात आल्याने तपास अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी. मालतेस मलमे तरुणाला फिर्यादी व त्याच्या लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेल्यांवर  तातडीने गुन्हा नोंद करून अटक करावी.


या मोर्चा चे स्वागत आणि प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार हिम्मतराव मलमे यांनी मानले.मोर्चाचे संपूर्ण नियोजन सुधीर नाईक,सुनिल दलवाई, संजय पाटोळे,सचिन जाधव यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆