जतच्या पाणी प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी मोठा लढा उभारणार...
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांचे प्रतिपादन...
हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाडर बोबलाद येथे शेतकरी मेळावा संपन्न...
======================================
======================================
सांगली | दि. १४ मार्च २०२२
वंचित बहुजन आघाडी जत तालुक्याच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा जाडर बोबलाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सर म्हणाले, प्रस्थापित व्यवस्थेने नेहमीच जतच्या जनतेला आश्वासने देऊन नेहमी झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाला स्वतंत्र विक्रीसाठी बाजार पेठ उभी केली पाहिजे. येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी जतच्या पाणी प्रश्नावर मोठा लढा उभा करेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ह.भ. प. तुकाराम महाराज म्हणाले, अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करा. जतच्या पाणी प्रश्नावर जत शहरात मोठा कार्यक्रम आयोजित करावा असेही त्यांनी बोलून दाखवले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल (अण्णा) पुजारी हे होते.सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश क्षीरसागर हरीश वाघमारे जिल्हा संघटक प्राध्यापक वाघमोडे सर जिल्हा सदस्य संजय उर्फ बंडू कांबळे, जिल्हासंघटक संजय कांबळे, जिल्हा सदस्य अनिल अंकलखोपे, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष राजू मुलानी, जाडर बबलाद चे उपसरपंच काटे साहेब, बजरंग अण्णा होंकळे, सुभाष साबळे अमोल साबळे, साहेबराव उबाळे व जत तालुक्याचे वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर आणि जाडर बबलाद जिल्हा परिषद गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆