BANNER

The Janshakti News

विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा निषेध.. ही तर हिटलरशाही- अमोल वेटम... लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, तात्काळ निलंबन करा...





विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा निषेध...
ही तर हिटलरशाही....
                           अमोल वेटम...

लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांंवर कारवाई करा, तात्काळ निलंबन करा...

------------------------------------------------------------------
                सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.

------------------------------------------------------------------

सांगली | दि.01/02/2022  

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यासाची सवय लागल्यामुळे विद्यार्थी आता ऑफलाइन परीक्षा देण्यासाठी तयार होत नसल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. राज्य सरकारने कोरोनाची लाट ओसरल्यामुळे कॉलेजमध्ये परीक्षा घेण्याची सूचना केली पण विद्यार्थ्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. 


आज शेकडो विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.कोरोनाची लाट ओसारल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय आता सुरू होणार आहे. एकीकडे पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे.  

संतापलेल्या या विद्यार्थ्यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच जमत जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण ऑनलाइन तर मग परीक्षा ऑफलाईन का ? असा सवाल काही विद्यार्थ्यांनी केला.


 विद्यार्थ्यावर झालेला लाठीचार्जचा निषेध रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केला.  विद्यार्थी हे आतंकवादी होते का ? लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिले, याचा शोध घेऊन तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील अमोल वेटम यांनी केली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆