BANNER

The Janshakti News

सेकंडरी स्कूल भिलवडी येथे सी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न ....



सेकंडरी स्कूल भिलवडी येथे सी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न ....
--------------------------------------------------------------------
          सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
            संपादक -  भाऊसाहेब रुपटक्के.
--------------------------------------------------------------------

भिलवडी | दि.३१/०१/२०२२

पलुस तालुक्यातील भिलवडी येथील सेकंडरी स्कूल भिलवडी येथे सी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.             
सी एस पाटील हे कृष्णा काठावरचं वारकरी सांप्रदायातील सात्विक व्यक्तिमत्व आमच्या संस्थेला लाभलं असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास चितळे यांनी सी. एस. पाटील यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे  तसेच हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष मा.गौरव नायकवडी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने श्री सी. एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेमार्फत शाल, श्रीफळ व बुके देऊन संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस. एन. कुलकर्णी व पर्यवेक्षक एस एल माने यांच्या हस्ते उभयता पेहराव, चांदीची गणेशमूर्ती देऊन सत्कार संपन्न झाला. सी एस पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्था व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केले व संस्थेस देणगी प्रदान केली. याप्रसंगी संस्थेचे  विश्वस्त जे.बी. चौगुले, संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,जयंत केळकर,व्यंकोजी जाधव, संस्थेचे आजीव सदस्य, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, मुख्याध्यापक ,माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर सेवक, सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले. निलेश कुडाळकर , पी एस सूर्यवंशी, साधना पाटील. हिंदुराव दाजी पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी तर सूत्रसंचालन सुनील भोये यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆