BANNER

The Janshakti News

भिलवडीत कृष्णाकाठतर्फे ना.डॉ. विश्वजीत कदम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भिलवडीत कृष्णाकाठतर्फे राज्यमंत्री ना.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.... 
-------------------------------------------------------------------
           सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
---------------------------------------------------------------------


भिलवडी | दि. १३/०१/२०२२ 

महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्व संपन्न नेतृत्व व राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह यांचा वाढदिवस भिलवडी तालुका पलुस येथे कृष्णाकाठ फाउंडेशन तर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

सातत्यपूर्ण ८ व्या वर्षी प्रकाशित होत असलेल्या कृष्णाकाठ दिनदर्शिकेचे भिलवडीचे माजी उपसरपंच चंद्रकांत (भाऊ) पाटील व व्यापारी वर्ग यांच्या हस्ते अनावरण करीत उपस्थित व्यापारी बंधूना मोफत दिनदर्शिका वितरण करण्यात आले.याप्रसंगी कृष्णाकाठ फौंडेशनचे  उपक्रम प्रेरणादायी असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले.त्याच सोबत समाजातील उपेक्षित घटक असलेल्या ऊसतोड कामगारांच्या चिमुकल्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन पुस्तके भेट देऊन व पेढे  वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.

कृष्णाकाठ संस्थेची वाटचाल डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या प्रेरणेने व  ना.डॉ.विश्वजीत कदम यांचे मार्गदर्शनाखाली उपक्रमशीलरित्या सुरु आहे. समाजातील वंचित घटक व विद्यार्थ्यांकरिता सामाजिक जाणीवेतून खारीचा वाटा उचलण्याचे सातत्याने प्रयत्न असल्याचे संस्थापक-अध्यक्ष अमोल वंडे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाकरिता व्यापारी बांधव, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.प्रास्ताविक केतन मोरे यांनी केले तर समीर कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले .   ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆