BANNER

The Janshakti News

स्व. आ. पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त व राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त.. माळवाडी (भिलवडी) येथे अपंग समावेशित संसाधन कक्ष , डिजीटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व दिव्यांग बालकांसाठी फिजीओथेरपी शिबीर संपन्न....





स्व. आ. पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त व राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम  यांच्या वाढदिवसानिमित्त..

माळवाडी (भिलवडी) येथे अपंग समावेशित संसाधन कक्ष , डिजीटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व दिव्यांग बालकांसाठी फिजीओथेरपी शिबीर संपन्न....





------------------------------------------------------

  सामान्य जनतेचा बुलंद आवाज...!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

-------------------------------------------------------


 भिलवडी - दि. १३ / ०१ / २०२२

आज दि.13 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा माळवाडी या ठिकाणी स्व.आ.डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंती निमित्त तसेच राज्यमंत्री मा.ना. डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा माळवाडी येथे राज्यमंत्री  मा.ना. डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेले समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग संसाधन व शीघ्र हस्तक्षेप कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच माळवाडी व भिलवडी परिसरातील दिव्यांग गरीब विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरेपी चे शिबिर आयोजित केले होते.या दिव्यांग संशोधन कक्षाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व दिव्यांग बालकांना शैक्षणिक सेवा सुविधांचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी भारती हॉस्पिटल चे प्रमुख मा. डॉ. एच एम (अण्णा )कदम हे प्रमुख पाहुणे होते. 




यावेळी त्यांनी भारती हॉस्पिटल च्या वतीने फिजिओथेरपी गरज असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भारती हॉस्पिटल येथे मोफत फिजिओथेरपी सेवा देण्याचे आवाहन केले.


 तसेच पलूस तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा. प्रसाद कालगावकर साहेब यांनीही या संसाधन कक्षातून मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा  बाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.डॉ. होसकोटी साहेब यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधांची माहिती दिली या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते कुंभार साहेब,पलूस पंचायत समितीच्या शिक्षण विस्ताराधिकारी माधुरी गुरव तसेच शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने सर , पंचायत समिती माजी सदस्य संताजी जाधव माळवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेय्या तांबोळी , उपसरपंच अजिंक्य कदम उपस्थित होते.  या संसाधन कक्षाच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान श्री. जावेद तांबोळी व सचिन देसाई यांनी दिले. तसेच संतोष पाटील,किरण पाटील,प्रवीण यादव,कपिल शेट्ये आणि SSC batch 1995 यांचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन विषय तज्ञ धनंजय भोळे व सूत्रसंचालन अरुण कोळी यांनी केले तसेच विशेष शिक्षिका रूपाली राजमाने भारती लुगडे, अमोल कोळेकर ,विनोद अल्लाट ,सुनील बनणे लेखाधिकारी विजयकुमार हनमाने रविंद्र चव्हाण या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना शिंदे, बबीता कर्नाळे,रोहित गुरव, प्रताप मोकाशी यांचे याठिकाणी सहकार्य लाभले या संसाधन कक्षाचे विशेष शिक्षक सागर कदम यांनी भिलवडी परिसरातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील दिव्यांग बालकांना सर्व शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे काम केले आहे यापुढेही सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ तसेच थेरपी सेवांचा लाभ, शिक्षक समुपदेशन पालक समुपदेशन आरोग्य बाबतच्या सर्व सुविधा देण्याचे काम सुरू आहे असे सांगितले.




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆