BANNER

The Janshakti News

ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या... सोनहीरा कारखाना परिसरातील घटना....



ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या...

सोनहीरा कारखाना परिसरातील घटना....

-------------------------------------------------------------------
         
          सामान्य जनतेचा बुलंद आवाज...!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

--------------------------------------------------------------------


वांगी | दि. 13 / 01 / 2022

वांगी  ता.कडेगाव  येथील सोनहीरा साखर कारखाना येथील वाहनतळावर एका ऊसतोड मजुराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
चिंचणी वांगी पोलीस ठाणेतून मिळालेली अधिक माहिती अशी की,संदीप बाबुराव राठोड (वय 36 वर्षे रा.जमशेदपूर पोस्ट-जामबजार ता.पुसद जि. यवतमाळ सध्या रा.आंधळी ता.पलूस जि. सांगली)
हा ऊसतोड मजूर म्हणून सोनहीरा कारखान्याकडे कामास आला आहे. बुधवार दि. १२/०१/२०२२ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास संदीप राठोड याने कारखाना परिसरातील वाहन तळाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.सदर घटनेची फिर्याद बाबुराव रुपसिंग राठोड यांनी पोलीस ठाणेत दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार  अधिकराव वनवे करीत आहेत.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■