BANNER

The Janshakti News

निधन वार्ता... अनाथांची माय...ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन....



अनाथांची माय...ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन....
--------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

-------------------------------------------------–------------------

पुणे | दि.०४ जानेवारी २०२२

महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८:१० मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.

अनाथांची माय...ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ

यांना




शोकाकुल -

" द.जनशक्ती न्यूज " 

मुख्यसंपादक - भाऊसाहेब रुपटक्के.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■