BANNER

The Janshakti News

खटाव तालुका पलूस येथील विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ................... भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....खटाव तालुका पलूस येथील विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ....

भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....

------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

------------------------------------------------------

भिलवडी | दि. ४ जानेवारी २०२२

पलूस तालुक्यातील खटाव येथील एका विवाहित महिलेने सासरकडील लोकांनी मानसिक व शारीरिक जाचहाट करुन छळकेल्या प्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिलवडी पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेतील वर्दिदार महिला सौ.पुजा रविंद्र स्वामी (जंगम) वय-26 वर्षे. व्यवसाय – घरकाम, रा. खटाव, ता. पलूस सध्या रा. माहेरी वडीलांचे घरी कुमठे, ता. तासगाव यांचा पलूस तालुक्यातील खटाव येथील आरोपी - 1) रविंद्र अंकुश स्वामी, 2) अंकुश विश्वनाथ स्वामी, 3) मंगल अंकुश स्वामी, 4) अमोल अंकुश स्वामी सर्व रा खटाव,
5) कोमल श्रीकांत स्वामी 6) श्रीकांत स्वामी दोघे रा. शिरवळ, पुणे या सासरकडील लोकांनी संगणमत करून वर्दिदार महिला सौ.पुजा रविंद्र स्वामी (जंगम) यांना ,
लग्नात मान पान केला नाही. माहेरुन पैसे, सोने घेवुन आली नाहीस, तुझ्यावर चांगले संस्कार नाहीत, फिर्यादीच्या पतीचे बाहेरील स्रीसोबत संबंध असून ते संबध फिर्यादी पत्नीने साभांळून घ्यावेत म्हणून सदर घटनेतील फिर्यादी महिला सौ.पुजा रविंद्र स्वामी (जंगम) यांना , वेळोवेळी शिवीगाळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपाशी पोटी ठेवुन फिर्यादीचा मानसिक व शारिरीक जाचहाट करून छळ केलेला आहे.  
सदर घटनेची वर्दी  सौ.पुजा रविंद्र स्वामी (जंगम) यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.


या घटनेतील आरोपी - 1) रविंद्र अंकुश स्वामी, 2) अंकुश विश्वनाथ स्वामी, 3) मंगल अंकुश स्वामी, 4) अमोल अंकुश स्वामी सर्व रा खटाव, 5) कोमल श्रीकांत स्वामी 6) श्रीकांत स्वामी दोघे रा. शिरवळ, पुणे
यांच्यावरती 12 13 भिलवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं.003/2022 भादविस क 498 (अ) 323,504,506.507.34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोफौ पाटील हे करीत आहेत.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
============================================================