BANNER

The Janshakti News

औदुंबर येथील पती-पत्नीला शेतजमिनीच्या वाटेच्या कारणावरून काठीने मारहाण.... भिलवडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल...औदुंबर येथील पती-पत्नीला शेतजमिनीच्या वाटेच्या कारणावरून काठीने मारहाण....

 भिलवडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल...

--------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

---------------------------------------------------------------------


भिलवडी | दि.८ जानेवारी २०२२

औदुंबर-मळीभाग तालुका पलुस येथे दि.६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २:००वा.सुमारास औदुंबर-मळीभाग कुलकर्णी  मश्जिद जवळ   शेतजमिनीचे वाटेचे कारणावरून पती-पत्नीला काठीने मारहाण झाले असल्याची घटना घडली आहे.
 सौ. मानिणी मोहन पाटील वय 45 वर्षे  रा. कुलकर्णी मश्जिदजवळ औदुंबर मळीभाग ता. पलुस, जि. सांगली यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेतील तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतजमिनीचे वाटेचे कारणावरून श्रीकृष्ण आनंदा पाटील क्य- 45 वर्षे धंदा- शेती
यानी  फिर्यादी सौ. मानिणी मोहन पाटील यांच्या पतीची कॉलर धरून अर्वाच भाषेत शिवीगाळ केली व  सौ. रुपाली श्रीकृष्ण पाटील वय - 38 वर्षे व प्रभावती आनंदा पाटील वय- 62 वर्षे  रा. मळीभाग औंदुबर ता. पलुस, जि. सांगली यांनी पाठीमागून काठीने मारहाण करत होते.त्यावेळी  सौ. मानिणी मोहन पाटील हे पतीस सोडविण्याकरिता गेले असता श्रीकृष्ण आनंदा पाटील यांनी त्यांच्या डोक्याचे केस धरून ओढून धक्काबुक्की करून त्यांना  खाली पाडून , छातीवर बसून  मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. 
म्हणून  सौ. मानिणी मोहन पाटील  यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेतील आरोपी- 
1) श्रीकृष्ण आनंदा पाटील क्य- 45 वर्षे धंदा- शेती 2) सौ. रुपाली श्रीकृष्ण पाटील वय - 38 वर्षे 3) प्रभावती आनंदा पाटील वय- 62 वर्षे  या तिन्ही आरोपींवर सीसीटाएनएस गुरनं 05/2022   354, 324, 323, 504, 34 भादंवि स कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भिलवडी पोलीस ठाण्याणे पोहेकाँ / 1668 श्री.पाटील यांनी सदरचा गुन्हा दाखल केला असून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ इनामदार हे पुढील तपास करीत आहेत.■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■