BANNER

The Janshakti News

धक्कादायक : लाईटच्या डांबावरुन जमिनवर खाली पडून एका २२ वर्षाच्या तरुणांचा मृत्यू ... -धक्कादायक : लाईटच्या डांबावरुन  जमिनवर खाली पडून  एका २२ वर्षाच्या तरुणांचा मृत्यू ...
-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

-------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. ९ जानेवारी२०२२

 अंकलखोप तालुका पलुस येथील  एस टी स्टॅण्डजवळ असलेल्या  लाईटच्या डांबावरुन  जमिनवर खाली पडून  एका २२ वर्षाच्या तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भिलवडी पोलीस ठाणे यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. 06/01/2022 रोजी सकाळी 1:30 वा. चे सुमारास उत्कर्ष दिपक पाटील वय 22 वर्षे रा कृष्णानगर कारंदवाडी ता. वाळवा जि. सांगली हा अंकलखोपगावी एस टी स्टॅण्डजवळ असलेल्या लाईटच्या डांबावर लाईटचे काम करणेकरीता चढला होता लाईटचे काम करीत असताना डांबावरुन जमिनीवर खाली छातीवर पडल्याने मार लागुन तो मयत झाला आहे. म्हणुन  वर्दीदार  - डॉ सीएमओ सायली गायकवाड सिव्हील हॉस्पीटल सांगली यांनी फोनवरुन वर्दी दिलेने अ.म.र.नं-02/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे मयत रजिस्टरी दाखल करणेत आली असून पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे साय्यक पोलीस निरीक्षक मा. कैलास कोडग सो यांच्या मार्गदर्शनाखाली  भिलवडी पोलीस करीत आहेत.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■