BANNER

The Janshakti News

भिलवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा... जोतीराम कदम यांची 'थायलंड' येथे होणाऱ्या दिव्यांग कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड...





भिलवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा...

जोतीराम कदम यांची 'थायलंड' येथे होणाऱ्या दिव्यांग कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड...




--------------------------------------------------------------------
                सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

--------------------------------------------------------------------


भिलवडी | दि.१० जानेवारी २०२२

पलुस तालुक्यातील भिलवडी-हाळभाग येथील 
दिव्यांग खेळाडू जोतीराम वसंत कदम  यांनी पुष्कर राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत मुंबई संघाकडून चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याची  'थायलंड' येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी  भारतीय संघात निवड करण्यात आली.

  पुष्कर राजस्थान येथे संपन्न झालेल्या माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या स्पर्धा दिव्यांग  कबड्डी खेळाडूंच्या साठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र , राजस्थान , दिल्ली , बिहार , मुंबई , पंजाब ,  झारखंड , उत्तरप्रदेश , छत्तीसगढ , इत्यादी राज्यातील दिव्यांग कबड्डी संघाने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कबड्डी संघाने चांगली कामगिरी करत महाराष्ट्र दिव्यांग कबड्डी संघ व्दितीय तर मुंबई दिव्यांग कबड्डी संघाने तृतीय स्थान प्रस्थापित केले.

मुंबई संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे भिलवडी-हाळभाग येथील दिव्यांग खेळाडू जोतीराम वसंत कदम याची                                 'थायलंड' येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी  भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ज्योतीराम कदम यांची भारतीय संघात निवड झाल्यामुळे भिलवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्यावरती भिलवडी व परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत निबंवडे,आटपाडी येथील आरीफ शेख  याला चांगली कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.या स्पर्धेयसाठी विनोद पाटील (कुमठे,तासगांव),अक्षय यादव, (हजारवाडी,पलुस) गणेश चव्हाण (तासगांव) यांनीही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेसाठी दिव्यांग क्रिडा असोसिएशन,सांगली चे कोच श्री.वैभव आंबी सर तसेच मार्गदर्शक श्री.योगेश शिंत्रे सर व कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले. 
तसेच या स्पर्धेसाठी दिव्यांग क्रिडा असोसिएशन,सांगली च्या सर्व खेळाडूचे सहकार्य लाभले.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

*आमचे मित्र व मार्गदर्शक  मा. शरद जाधव सर यांना *

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■