BANNER

The Janshakti News

शिक्षण आणि प्रगती एकत्र हातात हात घालून चालतात , पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर....? " माझी माऊली फाउंडेशन " च्या माध्यमातून प्रयत्न करणार.... श्री. ज्ञानेश्वर पारखे....शिक्षण आणि प्रगती एकत्र हातात हात घालून चालतात , पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर....? 

 " माझी माऊली फाउंडेशन "  च्या माध्यमातून प्रयत्न करणार....

                                श्री. ज्ञानेश्वर पारखे....
------------------------------------------------------------------

        सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

-------------------------------------------------------------------

नाशिक : त्र्यंबकेश्वर दि. 11 /01/2022

समाज म्हंटले कि तुमच्या आमच्यासारखे सगळेच लोक त्यात आले , सर्वांनाच रोजच्या रोज परिस्थितीशी झुंजावे लागते. तरीसुद्धा अश्या परिस्थितीतून माणूस बाहेर पडू शकतो तो केवळ शिक्षणामुळेच , शिक्षण आणि परिस्थिती एकाच वर्तुळात 
गुंफलेले असतात काही जण परिस्थिती नाही म्हणून शिकू शकत नाहीत आणि शिक्षण नाही म्हणून त्यांची परिस्थिती सुधारत नाही आज आपल्या अवतीभवती अशी अनेक ठिकाणे आहेत तेथे अपुऱ्या साधनांमुळे शिक्षण घेता येत नाही. अशाच गरजू लोकांपर्यंत " माझी माऊली फाउंडेशन " पोहोचत असते.संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील भाऊ घोडे यांच्या संकल्पनेतून व माझी माऊली फाउंडेशन च्या माध्यमातून दि. 09/01/2022 रोजी जिल्हा.नाशिक ता .त्र्यंबकेश्वर येथील मेटकावरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर तसेच त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत व " माझी माऊली फाऊंडेशन " चे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,व वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मास्कचे  वाटप करण्यात आले. शिक्षण आणि प्रगती एकत्र हातात हात घालून चालतात पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर आम्ही " माझी माऊली फाउंडेशन च्या माध्यमातून  संपूर्ण प्रयत्न करणार. साथ हवी ती दानशूर व्यक्तींची असे आव्हान माझी माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर पारखे यांनी जनतेला केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री संतोष उकांडे, संतोष लेहनार , नितीन सदावते,अक्षय मोरे,संजय वाघमारे, सुनिल घोडे,गणेश अडांगळे,विनोद बांगर इत्यादी उपस्थित होते.


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

-----------------------------------------------------------------


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■