BANNER

The Janshakti News

देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मा.शरद पवार यांना कोरोनाची बाधा...देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मा.शरद पवार यांना कोरोनाची बाधा...

--------------------------------------------------------------------
         सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
---------------------------------------------------------------------

मुंबई | दि.24/01/2022

 देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मा.शरद पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे.

देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेब यांना कोरोनाची बाधा झाली आहे ही बातमी समजताच  शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवार यांनी  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये शासकीय सर्व  नियमांचे पालन करीत घरात थांबणे पसंत केले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर जेंव्हा निर्बंध हटविण्यात आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा राज्यात आणि राजकारणात सक्रिय शहाभाग घेऊन त्यांनी अनेक भागात दौरे देखील केलेले होते.
कोरोनाची दुसरी लाट प्रचंड तीव्र होती परंतु सुदैवाने कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तिसऱ्या लाटेत मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाली होती, तिसऱ्या लाटेतही अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता  ओमीक्रॉनचे देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.  त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने नियम आणि निर्बंध कडक केलेले आहेत. शरद पवार याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच आपल्या ट्विटरवरून दिली असून संपर्कात आलेल्यानी तपासणी करून घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांचे वय ऐंशी वर्षाच्या पुढे असले तरी ते तरुणाला लाजवेल असे काम आजही करतात परंतु त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेच व्यथित झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता सगळ्यांनाच लागली आहे. अनेक मोठे आजार त्यांनी हिमतीने परतवून लावले आहेत तरीही त्यांचे वय पाहता कार्यकर्ते चिंतेत आहेत. स्वत: शरद पवार यांनीच काळजीचे कारण नसल्याचे सांगितले आहे तरी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे आणि सगळ्याच पक्षातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी कारण्याचे कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी.
 " असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे "

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆