BANNER

The Janshakti News

औदुंबर येथे ७९ वे साहित्य संमेलन संपन्न.... वेदना आणि संवेदनाचे प्रीतिसंगम साहित्यात निर्माण झाल्यास नवनिर्मिती शक्य... संमेलनाध्यक्ष प्रा.प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन..औदुंबर येथे ७९ वे साहित्य संमेलन संपन्न....

वेदना आणि संवेदनाचे प्रीतिसंगम साहित्यात निर्माण झाल्यास नवनिर्मिती शक्य...

    संमेलनाध्यक्ष प्रा.प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन..

--------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज...!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
----------------------------------------------------------------------

अंकलखोप | दि. १५ / ०१ / २०२२

औदुंबर ता.पलुस येथे शुक्रवार दि.१४ जानेवारी २०२२ रोजी सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित ७९ वे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले..

उत्तम साहित्य तरुण पिढीच्या मनात पेरली तर सामाजिक क्रांती होईल.
वेदना आणि संवेदनाचे प्रीतिसंगम साहित्यात निर्माण झाल्यास नवनिर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा.प्रवीण दवणे यांनी केले.
सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित ७९ व्या साहित्य संमेलन प्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सदानंद सामंत,कवी सुधांशु व म.भा.भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यापुढे बोलताना प्रा.प्रवीण दवणे म्हणाले की,यंत्रात ऊर्जा भरणारी आजची पिढी शरीरात चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत नाही.कथा,कविता,कादंबऱ्या ही आजच्या युगातील माणसाला रिचार्ज करणारी साधने आहेत.संपादना शिवाय प्रसिद्ध होणारे साहित्य भावनांचे सिमेंट करण करणारे ठरते. मातृभाषेचे स्थान हे शरीरातील हृद्यया सारख आहे.साहित्यिक,कलावंत,लेखक माणसाला माणूस करण्याचं कार्य करतात.भूतकाळात लिहिलं ,वर्तमानात जरी वाचलं तरी भविष्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जे कामी येत ते अभिजात साहित्य होय.
कवी सुधांशु याचे शब्द माझ्या काव्य निर्मितीची प्रेरणा आहे.
औदुंबर येथील साहित्य संमेलन हे केवळ संमेलन नसून तो एक सात्विक सोहळा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
२०१९ /२० व २०२१ या वर्षातील कवि सुधांशु व कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार -

२०१९ चा पुरस्कार - गणेश गोडसे (पाणी घातलेल्या झाडाची पानगळ), डॉ. ज्ञा. पु. सावंत अमरावती ( कंदील),

२०२० चा पुरस्कार - श्रीकृष्ण बेडेकर इंदोर ( आत्मनाद), नितीन भट अमरावती ( उन्हात घर माझे),

२०२१ चा. पुरस्कार - डॉ. विजयकुमार देशमुख, मुंबई, ( राघवशेला), संतोष कांबळे, पुणे (तुकाेबांच्या कुळाचा वंश) यांना देण्यात आले.

शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक,गिरीश जोशी यांनी अध्यक्षांचा परिचय केला.वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ह. रा.जोशी यांनी दिवंगताना श्रद्धांजली वाहिली तर पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.

यावेळी अंखलखोप गावच्या उपसरपंच सौ.स्वाती पाटील,सौ.प्रज्ञा दवणे,कवी सुभाष कवडे,प्रा.संतोष काळे,संदिप सूर्यवंशी,आप्पासाहेब पाटील,रघुराज मेटकरी,विजय जाधव,हिंमत पाटील,रमजान मुल्ला आदीसह साहित्यिक रसिक उपस्थित होते.

यावेळी आयोजित कविसंमेलनात  महेंद्र किणीकर( गणित चुकले), दिलीप कोळी, उदयराज पाटील (वाटणी), चंद्रकांत कणेरे ( माझी माय), राजेंद्र औंधकर ( पैलतीर), रामचंद्र गलांडे, (जाता जाता), अनंत ढिगवेकर (जग म्हणते मस्त पैकी जग), शिराज शिकलगार ( गझल), विश्वास बालीघाटे (माझे काय चुकले) अपर्णा जोशी ( ओवी), गणेश गोडसे ( स्मारक), सुभाष कट्टे ( स्वर्ग दिसते), अदित्य दवणे (तुझे माझे नाते सांग), आप्पासो पाटील ( पुर्वीचे दिवस चांगले होते), आर्या जोशी ( शाळेचे ऑनलाईन लेक्चर), ऋचा कुलकर्णी (गीत), सुभाषचंद्र भाटी ( जोगवा), प्रकाश कुलकर्णी ( भारूड), राहुल राजोपाध्ये ( निसर्ग खेळ), संतोष काळे, (घाव), रघुराज मेटकरी ( नोकरी), ) मोहन तोडकर (गीत), सुभाष कवडे ( झाड) विनय कुलकर्णी, प्रभाकर पाटील, जयवंत पाटील आदींनी विविध आश्याच्या कविता सादर केल्या.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆