BANNER

The Janshakti News

पत्रकारांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पलूस पोलिस ठाण्यात पलूस तालुक्यातील पत्रकारांनी केला गुन्हा दाखल...


पत्रकारांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पलूस पोलिस ठाण्यात पलूस तालुक्यातील पत्रकारांनी केला गुन्हा दाखल...

---------------------------------------------------------------------


            संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------

पलूस | दि. १८ डिसेंबर २०२१

पलूसकर एक नागरिक या फेसबुक खात्यावरून पत्रकारांची बदनामी करणारी व्यंगचित्र व मजकुराची पोस्ट प्रसिद्ध केल्या प्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात आज शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१६डिसेंबर २०२१रोजी पलूसकर एक नागरिक या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक वरून व्यंगचित्र व मजकूर द्वारे खोडसाळपणाने सर्व पत्रकारांची बदनामी केली. अशा प्रवृत्तीचा पलूस तालुक्यातील सर्व पत्रकारांनी घेतलेल्या बैठकीत निषेध केला.
यावेळी पलुस पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या अकांऊट चालवणखर्याविरूद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार अशा गुन्ह्याला पाठीशी घालणार्याविरूद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान पलूसकर एक नागरिक या फेसबुकवर खाते चालवणार्या अज्ञाताविरूद्ध सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
हे प्रकरण गंभीर असून पलूसकर एक नागरिक हे फेसबुक खाते चालवणार्याचा तपास सायबर सेल मार्फत सुरू केला असून लवकरच फेसबुकवर हे खाते चालवणारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स.पो.नि.विकास जाधव यांनी सांगितले.
यावेळी यशवंत कदम, तुकाराम धायगुडे,धनंजय दौंडे, संजय गणेशकर , शशिकांत रेपाळ, वैभव माळी, संदीप नाझरे, अशुतोष कस्तुरे, जमीर सनदी, श्रीकृष्ण औटे,सचिन लडगे, शिवकुमार खारकांडे,
हारुण मगदूम ,महेश पुदाले कुमार गायकवाड, वैभव यादव, संजय कुंभार, किशोर आरबुने, गायकवाड,राकेश तरिमारे, साहिल मगदूम,समंदर मगदूम उपस्थित होते.--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------