BANNER

The Janshakti News

चितळे डेअरीस नाबार्डचे महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत यांची भेट...

चितळे डेअरीस नाबार्डचे महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत यांची भेट...
-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
-------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. 18 डिसेंबर 2021

 नाबार्डचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य   महाव्यवस्थापक गोवर्धनसिंह रावत यांनी मे.बी.जी.चितळे डेअरीस सदिच्छा भेट दिली.नाबार्ड व मे.बी.जी.चितळे डेअरी  पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या उदय प्रशिक्षण कार्यक्रमाची पाहणी केली.विश्वास चितळे यांच्या हस्ते गोवर्धनसिंह रावत यांचा सत्कार करण्यात आला.
 
नाबार्ड व चितळे डेअरी राबवित असलेल्या उदय  प्रशिक्षण कार्यक्रमामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असल्याचे प्रतिपादन 
गोवर्धनसिंह रावत यांनी व्यक्त केले.
उदय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पाच हजार जोडप्यांना प्रशिक्षण दिले असून तुजारपूर गावातील शंभर टक्के दूध उत्पादकाना प्रशिक्षित करण्यात आले असल्याची माहिती विश्वास चितळे यांनी दिली.
 प्रगतशील शेतकरी मकरंद पाटील, सचिन पाटील,दिलीप पाटील,अरविंद बाबर तसेच वाघवाडी येथील सचिन वाघ यांच्या गोठयांची पाहणी करून संवाद साधला.यावेळी सांगली जिल्हा नाबार्ड अधिकारी एल.पी. धानोरकर,चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे,       मकरंद चितळे     ,अतुल चितळे,  आर.बी.राजपुरे आदींसह उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते.डॉ.एच.आर. इंगळे यांनी प्रास्ताविक केले तर सी. व्ही.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.---------------------------------------------------------------------