BANNER

The Janshakti News

बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाने दिली मंजुरी ... वसगडे ता. पलूस येथील बैलगाडी शर्यतप्रेमींनी गुलालाची उधळण करीत आनंदाेत्सव साजरा केला.

बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाने दिली मंजुरी ...

वसगडे ता. पलूस येथील बैलगाडी शर्यतप्रेमींनी गुलालाची उधळण करीत आनंदाेत्सव साजरा केला.-----------------------------------------------------------------

            संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

------------------------------------------------------------------
 वसगडे | दि. 17/12/2021

राज्यातील खिल्लार पैदास करून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांच्या व्यावसायिक जीवनाशी निगडीत विषय असलेल्या बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाने सशर्त मंजुरी दिली
सांगली जिल्ह्यात खासकरून वसगडे तालुका पलूस येथील बैलगाडी शर्यतप्रेमींनी गुलालाची उधळण करीत आनंदाेत्सव साजरा केला. 


यावेळी या लढ्यामध्ये तसेच तालुक्याच्या आंदोलनाचे नेतृत्व व केलेल्या योगदानाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांची वसगडे ग्रामस्थांनी शर्यतप्रेमींनी गुलालाची उधळण करीत बैलगाडीतून गावात मिरवणुक काढली.याप्रसंगी संदीप राजोबा म्हणाले, या निर्णयामुळे राज्यातील खिल्लार जात पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांसह बैलगाडी शर्यत मालक चालका मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. खऱ्या अर्थाने खिल्लार पैदास पालन-पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचे यश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या व बळीराजाची शान असणाऱ्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.


 यावेळी प्रशांत ऊर्फ भागेश जाधव ,सुजित जाधव, पलुस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष धन्यकुमार पाटील रमाकांत शेटे सागर भोसेकर ,सुनील चव्हाण ,प्रशांत हजारे ,अमित पारित, आदिल लांडगे,संदीप पाटील ,मनोज पाटील ,अयुब मुलानी ,अमोल हजारे ,अय्याज मुलानी तसेच खिलार बैलगाडी शर्यत प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------------------------------