BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सचिव पदी मानसिंग हाके यांची निवड...



भिलवडी शिक्षण संस्थेच्या सचिव पदी मानसिंग हाके यांची निवड...

भिलवडी | दि. ०२ / १२ / २०२१

भिलवडी ता.पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सचिवपदी मानसिंग हाके यांची निवड करण्यात आली.
सहसचिव पदी के.डी.पाटील यांची निवड करण्यात आली. भिलवडी शिक्षण संथेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकी मध्ये या निवडी जाहीर करण्यात आल्या.संस्थेचे माजी सचिव संजय कुलकर्णी,नूतन सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील यांचा विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मानसिंग हाके म्हणाले की,भिलवडी शिक्षण संस्थेने मोठी जबाबदारी दिली असून संस्था पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखा, विभागप्रमुख,शिक्षक,सेवक,पालक व विद्यार्थी यांच्याशी योग्य समन्वय साधून संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी विश्वस्त जे. बी चौगुले,संचालक डी. के. किणीकर,व्यंकोजी जाधव,विजय तेली,प्रा.मनिषा पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर , विद्या टोणपे आदी उपस्थित होते.