BANNER

The Janshakti News

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पलूस येथे दिव्यांग बांधवांचा भव्य मेळावा संपन्न....जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पलूस येथे दिव्यांग बांधवांचा  भव्य मेळावा संपन्न....


पलूस | दि. 03/12/2021

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा दिव्यांग काँग्रेस सेल व कृष्णाकाठ दिव्यांग संस्था संतगांव तालुका पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा पलूस येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. 


 दिव्यांगाना आंत्योदय शिधापत्रिका वाटप ,  युनिक  कार्ड वाटप व समावेशित शिक्षणामधील इयत्ता १० वी , १२ वी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समावेशित  शिक्षण पंचायत समिती पलूस मधील विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांचा सन्मान यावेळी  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा.महिंद्र (आप्पा) लाड , मा.गिरीश (काका) गोंदिल , मा. वैभव (दादा) उगळे , मा. विजय (आप्पा) आरबुने , पलूस तहसीलचे नायब तहसीलदार मा. पाटील साहेब उपस्थित होते.
 पंचायत समिती पलूस मधील विशेष शिक्षक सागर कदम , विनोद अल्लाट , अमोल कोळेकर , भारती लुगडे , शुभांगी रुईकर , रूपाली राजमाने , पौर्णिमा आकळे ,  सुनील बन्ने यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


  दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी व दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणारे दिव्यांग बांधव मा. राजेंद्र खोडवे यांनी  या  कार्यक्रमाचे अगदी शिस्तबद्ध पध्दतीने आयोजन केले होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सागर कदम सर यांनी केले व द.जनशक्ती न्यूजचे मुख्यसंपादक दिव्यांग बांधव मा. भाऊसाहेब रुपटक्के  यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.