BANNER

The Janshakti News

शांतीनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुर्ली येथे मेरी ख्रिसमस दिन मोठ्या उत्साहात साजरा...शांतीनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुर्ली येथे मेरी ख्रिसमस दिन मोठ्या उत्साहात साजरा... 

               *कार्यक्रमाचे संपूर्ण क्षणचित्रे*
                 👇👇👇👇👇👇👇👇

--------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

--------------------------------------------------------------------

बुर्ली | दि. 24 डिसेंबर 2021

25 डिसेंबरला मेरी ख्रिसमस दिन (नाताळ) निमित्त शैक्षणिक सुट्टी असल्या कारणाने
श्री. स्वामी दौलतगिरी शिक्षण संस्था .
शांतीनिकेतन इंटरनॅशनल स्कूल बुर्ली तालुका पलूस येथे  आज मेरी ख्रिसमस दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा . श्री . हेमंत ( आण्णा ) पाटील व भिलवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा.मनोज गुरव , DPI चे तालुका उपाध्यक्ष मा. शंकर सुपनेकर सह   इतर मान्यवर व शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते.

 मेरी ख्रिसमस दिनाच्या निमित्ताने शाळेतील
 मुलांनी नृत्य , नाटक , फॅन्सी ड्रेस फॅशन शो व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. त्याच बरोबर शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या सह सर्व मान्यवरांनी  मुलांच्या समवेत राहून केक कापून त्यांना मेरी ख्रिसमस दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

 मेरी ख्रिसमस दिनाचे औचित्य साधून शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी कु . शिव प्रविण जौंजाळे यांच्या आई स्वर्गिय आशा प्रविण जौंजाळे यांच्या स्मरणार्थ भिलवडी ग्रामपंचायतीचे सदस्य मा. मनोज बाळासाहेब गुरव यांनी सर्व विद्यार्थ्यांना  खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व विद्यार्थ्यांना पूढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सदाशिव कांबळे सर व भाऊसाहेब रुपटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सिपल प्रल्हाद जाधव सर ,  सुत्रसंचलन अमृता टोनपे मॅंडम यांनी केले तर आश्विनी पुजारी मॅंडम यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
--------------------------------------------------------------------