BANNER

The Janshakti News

जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांची गाजलेली तीन पुस्तके इ ऑडीओ बुक स्वरूपात सोशल मिडियावर उपलब्ध...जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांची गाजलेली तीन पुस्तके इ ऑडीओ बुक स्वरूपात सोशल मिडियावर उपलब्ध...
 -------------------------------------------------------------------
               संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
--------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 12/12/2021

भिलवडी ता. पलूस येथील प्रसिद्ध लेखक संवेदनशील प्रसिद्ध कवी व सानेगुरुजींच्या वाड्मयाचे अभ्यासक व प्रचारक श्री.सुभाष कवडे सर यांनी लिहलेले तीन पुस्तके ई ऑडीओ बुक स्वरूपात सध्या सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत.
 २०२१ या एका वर्षात तीन पुस्तके ई ऑडीओ बुक होण्याचा मान सुभाष कवडे सर यांना मिळाल्याने त्यांच्या इ ऑडीओ बुक चे सर्वत्र स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 
सुभाष कवडे यांचे आत्मचरित्रात्मक लेखांचे "जांभळमाया" हे पुस्तक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे वतीने श्री.विठ्ठल मोहिते व सौ.वैशाली आडमुठे यांनी ई ऑडीओ बुक बनविले आहे.

"संस्कार शिदोरी" हे बाल संस्कार कथाचे पुस्तक डायटचे प्राध्यापक श्री. प्रकाश भुते व सौ.भुते मँडम यांनी बनविले आहे.


"श्यामची आई पुस्तकातील संस्कार धन" उपक्रमशील शिक्षक श्री.शरद जाधव सर यांनी ई ऑडीओ बुक स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे.

जांभळ माया या पुस्तकाचे चाळीस भाग आहेत तर संस्कार शिदोरी या पुस्तकात बावन्न बालसंस्कार कथा आहेत व श्यामची आई पुस्तकातील संस्कार धन या पुस्तकात श्यामची आई या पुस्तकातील १०० निवडक सुविचाराचा समावेश आहे.
 
या वर्षात आत्तापर्यंत या तीनही पुस्तकांचा लाभ हजारो मराठी सुज्ञ वाचकांनी घेतला आहे व घेत आहेत. सध्या हि तिनहि पुस्तके सोशल मिडियावर उपलब्ध आहेत. शेकडो वाचक वेळोवेळी पुस्तकाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवीत आहेत.या तीनही पुस्तकाचे या पूर्वी ई ऑडीओ बुक स्वरूपात क्रमशः सोशल मिडीयावरून सादरीकरण झालेले आहे. साहित्य वर्तुळातील हि घटना यावर्षातील एक आनंददायी उपक्रम म्हणून कौतुकास्पद ठरली आहे.

मराठी वाचकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठ्ठल मोहिते , सौ.वैशाली आडमुठे ,  श्री.प्रकाश भुते , श्री. शरद जाधव व लेखक श्री. सुभाष कवडे यांनी केले आहे.
--- ---------------------------------------------------------------