BANNER

The Janshakti News

मोराळे येथे जागतिक मानवाधिकार दिन उत्साहात साजरा...मोराळे येथे जागतिक मानवाधिकार दिन उत्साहात साजरा...
--------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
पलूस | दि. ११ डिसेंबर २०२१

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या पलूस तालुक्याच्या वतीने मोराळे येथे जिल्हा परिषद शाळेच्या विध्यर्थ्यांना स्कुल बॅग वाटप व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्याचा गौरव करून जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. 
      या कार्यक्रमास पलूस तहसीलदार निवास ढाणे , आरोग्य अधिकारी डॉ अधिक पाटील,ह्यूमन राईट्स राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम ,यांच्या प्रमुख उपस्तिथीत सम्पन्न झाला. 
      कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम यांनी न्यायाधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी मानवाधिकार चळवळीत सामील व्हावे असे आवाहन केले, तहसीलदार साहेब यांनी संघटना करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या , जिल्हा महिला अध्यक्षा पुष्पा भोसले यांनी मुली व महिला यांचे हक्क व अधिकार विषयी माहिती दिली ,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेस सहकार्य करू असे सांगितले.
     यावेळी महिला जिल्हा निरीक्षक पदी निवड झालेबद्दल अश्विनी चव्हाण यांना संघटनेचे ओळखपत्र दिले.


   यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले, उपाध्यक्ष डॉ दीपक सरनाईक ,सचिव वैभवराजे भोसले, सरपंच प्रियांका शिरतोडे, तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, कार्याध्यक्ष संजय आमणे, महादेव कचरे,मोहन जाधव, अमर सूर्यवंशी, सचिन जाधव ,तालुका महिला अध्यक्षा लता माने, मंजुश्या जाधव,शुभांगी काशीद, शितापे मॅडम,अश्विनी चव्हाण, परशुराम होळकर, प्रफुल्ल गाडे, प्रमोद पाटील,कुमार सव्वाशे, अशोक शिंदे,बाळासाहेब पाटील व सर्व सभासद, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
-------------------------------------------------------------------