BANNER

The Janshakti News

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची वार्ड क्रं. १६ अ ची पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार...सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची वार्ड क्रं. १६ अ ची पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार...


मिरजेतील पत्रकार परिषदेत दिली माहिती..

सांगली | दि. १ डिसेंबर २०२१

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका वार्ड क्र. १६ अ ची पोटनिवडणूकीसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. येणाऱ्या सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्व निवडणुका लढणार आहोत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी यांनी दिली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सतिश शिकलगार, अनिल मोरे आदी उपस्थित होते. एकीकडे महानगरपालिकेची वार्ड क्र. १६ अ ची पोटनिवडणूक काँग्रेस नेते ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करत असताना वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.