BANNER

The Janshakti News

भीषण अपघात: - ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावरून जाऊन महिला जागीच ठार... मुलीच्या सासरी दिवाळीचा फराळ देऊन घरी परत जात असताना घडली दुर्दैवी घटना...भीषण अपघात: - ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावरून जाऊन महिला जागीच ठार...

मुलीच्या सासरी दिवाळीचा फराळ देऊन घरी परत जात असताना घडली दुर्दैवी घटना...

कडेगाव | दि.07/11/2021

मुलीच्या सासरी दिवाळी देऊन आपल्या घरी परत जात असताना दुचाकी मोटरसायकल व उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली चा भीषण अपघात घडून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वांगी तालुका कडेगाव येथील चव्हाण मळा परिसरात घडली आहे. अपघातातील मयत महिलेचे पती अंकुश गुलाबराव पिसाळ वय वर्षे 50 व्यवसाय शेती राहणार चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा व त्यांची पत्नी सौ.पद्मा अंकुश पिसाळ वय वर्ष 42 हे दोघे पती-पत्नी आपल्या मुलीच्या सासरी दिवाळी सणाचा फराळ देऊन आपल्या मोटरसायकल नंबर एम एच 11 डी. सी. 0751 वरून जुना सातारा रोडने चोराडे गावी जात असताना चव्हाण मळा, वांगी येथे ट्रॅक्टर नंबर एम. एच. 11- 26 37 व दोन उसाने भरलेल्या ट्रॉल्या वांगी गावाकडे घेऊन निघाला होता. त्यावेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्‍टर ड्रायव्हर ने ट्रॉलीला जोराचा झोला दिल्यामुळे मोटरसायकल वरील महिला सौ पद्मा अंकुश पिसाळ यांना ट्रॉली मधील उसाचा धक्का बसल्यामुळे सदर मयत महिला सरळ ट्रॉलीच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या दोन्ही हाताला, उजव्या बरखडीला व छातीस गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या सदर घटनेची फिर्याद मयत महिलेचा पती अंकुश गुलाबराव पिसाळ यांनी वांगी पोलीस ठाण्यात दिली असून सदर अपघातांमध्ये ट्रॅक्टर नंबर एम. एच. 11 - 26 37 व दोन उसाने भरलेल्या ट्रॉल्या वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.