BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे सार्वजनिक वाचनालयाने केले सन.२०२१ च्या दिवाळी अंकाचे प्रदर्शन... -----साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने सफाई कामगारांना भेटवस्तू व फराळाचे केले वाटप...



भिलवडी येथे सार्वजनिक वाचनालयाने केले सन.२०२१ च्या दिवाळी अंकाचे प्रदर्शन...
-----साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने सफाई कामगारांना भेटवस्तू व फराळाचे केले वाटप...

भिलवडी | दि.०५/११/२०२१

भिलवडी ता. पलूस : दिवाळी सणाच्या निमित्ताने दि. ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे दिवाळी अंक सन.२०२१ चे प्रदर्शन सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आयोजित करण्यात आले व साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने भिलवडी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांना भेटवस्तू व फराळाचे वाटप केले.

दिवाळी अंक प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीष चितळे .कार्यवाह श्री .सुभाष कवडे , श्री .जयंत केळकर (सदस्य ) श्री .दत्ताञय रा.कदम (सदस्य) श्री .जयकुमार तारे व सेवक ,सभासद,वाचक उपस्थित होते.100 दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले.
प्रारंभी डी. आर. कदम यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिवाळी अंक उपक्रमाची माहिती सांगितली. 100 रुपयात 100 दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. श्री जयकुमार तारे यांनी दिवाळी अंक उपक्रमासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा गिरीश चितळे यांच्या हस्ते पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश चितळे यांनी वीस दिवाळी अंक तर पत्रकार शरद जाधव यांनी दीपोत्सव हा दिवाळी अंक वाचनालयास भेट दिला.
यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले किल्ला , दिवाळी अंक आणि दिवाळी फराळ दिवाळी सणाची महाराष्ट्राची खास परंपरा आहे. वाचनालयाने दिवाळी अंक उपक्रम सुरू करून वाचन चळवळ रुजविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. या उपक्रमास माझे नेहमी सहकार्य राहील.
श्रीयुत ज. कृ. केळकर यांनी आभार मानले. यावेळी सौ लीना चितळे, युक्ता चितळे , ग्रंथपाल वामन काटीकर , श्रीयुत प्रदीप शेटे यांच्यासह वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.
-–-- त्याचबरोबर साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी भिलवडी ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले.


उद्योगपती गिरीश चितळे यांचे हस्ते पंधरा सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले.
केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी उपक्रमाचा हेतू सांगून गेली दहा वर्षे हा उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. सफाई कर्मचारी गावचे स्वच्छता दूत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने हा उपक्रम गेली दहा वर्षे सुरू असल्याचे श्रीयुत कवडे यांनी सांगितले. उपक्रमासाठी श्रीयुत अल्ताफ सुतार ( साहेब ) यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री बाळासाहेब माने सर यांनी सूत्रसंचालन केले.
श्रीयुत गिरीश चितळे यांनी हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून चितळे कुटुंबीय अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य करेल संस्कार केंद्राचे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असल्याचे ही सांगितले.
श्रीयुत संजय गुरव सर यांनी आभार मानले श्रीयुत हनुमंतराव डिसले, के. आर. पाटील , घनश्याम रेळेकर आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.