BANNER

The Janshakti News

पलूस : सावंतपूर वसाहती मधील जिल्हा परिषद शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...पलूस : सावंतपूर वसाहती मधील जिल्हा परिषद  शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...


पलूस | दि.14/11/2021

जिल्हा परिषद  शाळा सावंतपुर वसाहत येथे आज रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी  पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात सर्वांचे लाडके चाचा नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका बिना माने मॅडम, तसेच सुधा सुतार मॅडम, मॅडम सुवर्णा सावंत मॅडम ,मीनाक्षी सुतार मॅडम ,नंदाताई पाटील मॅडम, पुष्पाराजे मॅडम, प्रीती बुरले मॅडम व मेघा चव्हाण मॅडम शितल पाटील मॅडम, धनंजय साळुंखे सर व पालक उपस्थित होते.


 या कार्यक्रमाकरिता शाळेतील बालचमू चाचा नेहरू यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. तसेच सर्वप्रथम प्रीती बुरले मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजीमधून केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता चौथीचे विद्यार्थी प्रतिनिधीने भूषवले होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. 


 इयत्ता पहिली दुसरी तिसरी व चौथी च्या काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व चाचा नेहरू यांच्या जिवन कार्याला उजाळा  दिला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुधा सुतार मॅडम यांनी पंडित नेहरू यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना सांगितले. 

मेघा चव्हाण मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर आमच्या जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय साळुंखे सर यांनी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात जिल्हा परिषद​ शाळा सावंतपुर वसाहत येथे आनंदी अशा वातावरणात  बाल दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.