BANNER

The Janshakti News

भिलवडी : व्यापारी संघटना आयोजित किल्ला स्पर्धेत नटराज मित्रमंडळ - अमृत चौक प्रथम....




भिलवडी : व्यापारी संघटना आयोजित किल्ला स्पर्धेत  नटराज मित्रमंडळ - अमृत चौक  प्रथम....
  
भिलवडी | दि. 19/11/2021

व्यापारी संघटना भिलवडी ता.पलूस यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेमध्ये  नटराज ग्रुप आणि अमृत चौक मंडळाने विभागून प्रथम क्रमांक पटकावला. 

 
व्यापारी संघटनेच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.  
व्यापारी संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी विविध उपक्रम आयोजित केले होते.1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मुबारक चाँद पठाण आणि शंकर पांडुरंग वावरे यांचा सत्कार करण्यात आला.भिलवडी आणि परिसरातल्या दिव्यांग बांधवांच्या मुलांना या वेळी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.



महापूर आणि कोरोना काळामध्ये काम करणार्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र ,आशासेविका संघटना , महावितरण ,आपत्ती व्यवस्थापन समिती, भिलवडी पोलिस ठाणे या संस्थांचा आणि बोट चालक नितीन गुरव आणि गजानन नरळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  



या वेळी इथल्या तरुण मंडळांनी केलेले किल्ले प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थिताना दाखवण्यात आले.  
अत्यंत उत्साही वातावरण ,देशभक्तिपर गाणी, आणि हजारो दिव्यांनी कृष्णाघाट उजळला होता.दीपोत्सव पाहण्यासाठी कृष्णाघाटावरचा पूर्ण परिसर, भिलवडीचा मुख्य पूल आणि वावरीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.  आपल्या मोबाईलमध्ये हे विलोभनीय दृश्य टिपून घेण्यासाठी तरुणाई मग्न होती.खास करुन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.    



या कार्यक्रमासाठी भिलवडीचे माजी जि.प. सदस्य संग्राम पाटील,सांगलीचे सिद्धिविनायक शिंदे, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी-सदस्य  किल्ला स्पर्धेचे सर्व स्पर्धक  उपस्थित होते.  
व्यापारी संघटनेच्या संचालक मंडळाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
किल्ला स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
दुसरा क्रमांक-शिवप्रतिष्ठान ग्रुप आणि सुदर्शन मंडळ  
तिसरा क्रमांक-सुनील स्मृती मित्रमंडळ आणि समर्थ युवाशक्ती ग्रुप  
उत्तेजनार्थ- येळकोट चौक, नटराज ग्रुप, विजयंता ग्रुप    
तरुणींमध्ये प्रथम क्रमांक-वेदिका शांतिनाथ शेडबाळकर
 द्वितीय क्रमांक-तनिष्का अजितकुमार पाटील  
सर्वोत्कृष्ट माहिती सांगणारा मावळा-वैभव पाटील