BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील व्यापारी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.....भिलवडी येथील व्यापारी संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.....

भिलवडी | दि. 17/11/2021

 भिलवडी तालुका पलूस येथील व्यापारी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता (6:00 वाजता) भिलवडी येथील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक घाटावर  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 या कार्यक्रमांमध्ये किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ , त्रिपुरारी पौर्णिमा , कोरोना आणि महापुराच्या काळात उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्या संस्थांचा सत्कार , दिव्यांग बांधवांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप , आणि 1971 च्या युद्धातील सहभागी माजी सैनिकांचा सत्कार व अभिवादन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
   आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दृष्टिकोनातून  सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर राहून  आपले व्यापार , दुकान , व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता संघटना स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत  विविध प्रकारचे उपक्रम भिलवडी येथील व्यापारी संघटनेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. भिलवडी येथील व्यापारी संघटनेने सामाजिक उपक्रमामध्ये गरुडझेप घेतल्याची  चर्चा सर्वत्र होत आहे.  
  
उद्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सांयकाळी 6 : 00 वाजता विविध कार्यक्रमांचा नेत्रदीपक सोहळा भिलवडी येथे कृष्णा नदीच्या ऐतिहासिक  घाटावर संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे अवाहन भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .....