BANNER

The Janshakti News

आमनापूर पुलाच्या दुरुस्तीसाठी आरपीआयची निदर्शने..... नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शासनाचा निषेध.....आमनापूर पुलाच्या दुरुस्तीसाठी आरपीआयची निदर्शने.....

नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शासनाचा निषेध.....


रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने करून मागण्याचे निवेदन एम.एस पाटील यांना देताना आरपीआयचे विशाल तिरमारे,शाहरुख संदे,शितल मोरे,सरफराज फकीर व कार्यकर्ते

पलूस | दि.१४ / १० / २०२१

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने पलूस तालुक्यातील आमनापूर कृष्णा नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे लोखंडी ग्रील दुरुस्ती करण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली आमनापूर कृष्णा नदीच्या पुलावर तीव्र निदर्शने करण्यात आली. दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून न देणाऱ्या शासनाचा निषेध करून त्याबाबतचे निवेदन पलूस उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी एम.एस.पाटील यांना रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने दिले.


यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की,रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी दुरुस्ती करा अन्यथा नदीच्या पुलावर उग्र आंदोलन करू असा इशारा निवदनाद्वारे देण्यात आला होता. शासनाकडे दुरुस्तीसाठी निधी नाही अशा प्रकारचे पत्र पक्षाला देण्यात आले होते. शासन निधी उपलब्ध करत नसल्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.अंदाजे दुरुस्ती साठी सतरा लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.
शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून नागरिकांच्या जिवितास धोका असणाऱ्या नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे अन्यथा रिपब्लिकन पक्ष इथून पुढील आंदोलन उग्र करेल असा निर्वाणीचा इशारा आरपीआयच्या वतीने अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे यांनी दिला.आंदोलकांना प्रशासनाच्या वतीने आठ दिवसात याविषयी मार्ग काढू असा शब्द देण्यात आला.
आंदोलनास आमनापूर नागरिकांच्या वतीने दोस्ती सोशल फाउंडेशन युथ पॉवर चे संस्थापक अध्यक्ष शाहरुख संदे यांनी कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिला.

रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे,अंकलखोप आरपीआयचे नेते प्रदीप लांडगे,सरफराज फकीर,वैभव तिरमारे,बुर्लीचे पारस जावीर, पुनदीचे शरद पाटील,सुमित तिरमारे, इर्शाद संदे, गणेश पाटील,उदय माळी, संताजी देशमुख-तातूगडे,सुबोध तिरमारे, अभिजित निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.