BANNER

The Janshakti News

बांधकाम व नाका कामगारांना दैंनदिन मोफत मध्यान्ह भोजन... आखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचा उपक्रम...बांधकाम व नाका कामगारांना दैंनदिन मोफत मध्यान्ह भोजन...

आखिल महाराष्ट्र  कामगार-कर्मचारी संघाचा उपक्रम...

आटपाडी / विठलापूर | दि.१४/१०/२०२१
         

       श्रद्धेय.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे आखिल महाराष्ट्र  कामगार-कर्मचारी संघ  यांच्या विद्यमाने सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय भूपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली.. 


आटपाडी तालुक्याच्या वतीने प्रथमता आटपाडी शहरामध्ये बुधवार दि.१३/१०/२०२१ रोजी सायंकाळी ७:३० वाजता व विठलापूर येथे ८:३० वाजता बांधकाम इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम व नाका कामगारांना दैंनदिन मोफत मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्याचा प्रारंभ करण्यात आला.


       यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते मा.अरुण(भाऊ)वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुकाध्यक्ष मा.साहेबराव चंदनशिवे,ज्येष्ठ समाजसेवक मा.शंकर सावंत,वंचित बहुजन आघाडीचे विठलापूर ग्रा.पं.सदस्य,मा.बापू सावंत,अखिल महाराष्ट्र  कामगार-कर्मचारी संघाचे आटपाडी तालुकाध्यक्ष मा.आबासो काटे,तालुका सचिव मा.शैलेंद्र ऐवळे या सर्वांच्या हस्ते आटपाडी तसेच विठलापूर येथील गरजू लोकांना मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले.


       गरजू,उपेक्षित लोकांना या मोफत जेवणाच्या माध्यमातून कुठेतरी हातभार मिळावा.एक समाजपयोगी चालना दृढ होत जावी यासाठी आपण सर्वांनी पुरेपूर प्रयत्न करुयात तसेच एकमेकांप्रती सहकार्याची भावना जपूयात असे सूचक वक्तव्य मा.अरुण(भाऊ)वाघमारे यांनी सर्वांसमोर बोलताना व्यक्त केले.
       यावेळेस वडर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण,मारुती चव्हाण,सिद्धार्थ वाघमारे,सुरज चव्हाण,भिकाजी खरात,कबीर गळवे यांच्या बरोबरच  वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य वडर समाज श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगार तसेच नाका कामगार बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.