BANNER

The Janshakti News

भिलवडी (ता.पलूस) : महापूरामुळे पडलेल्या घरांचा फेर सर्व्हे करा.. सरपंच सौ.सविता महिंद-पाटील.भिलवडी (ता.पलूस) :  महापूरामुळे पडलेल्या घरांचा फेर सर्व्हे करा.. सरपंच सौ.सविता महिंद-पाटील.

भिलवडी | दि. ०८/१०/२०२१

पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जुलै 2021 मध्ये आलेल्या महापूरामुळे भिलवडी व भिलवडीच्या भागातील पूरबाधित नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पूर ओसरल्या नंतर पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे शासनाने केले. सदरचे पंचनामे 15% 25% 50% 100% अशा प्रकारे केले गेले आहेत. परंतु 2019 मध्ये 95,100 रु.मिळाले आहेत आश्या लोकांचे घर पडझड यादीतून नांवे वगळण्यात आले आहेत. 2019 मध्ये मिळालेल्या मदतीतून लोक घर दुरुस्त करून  राहण्यास गेले पण 2021 च्या महापुराने पुन्हा त्याच घरांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने ही बाब लक्षात घेऊन  जुलै 2021 च्या महापुरा मध्ये पडझड झालेल्या धारांचा सर्वे पुन्हा करून घर पडझडीचा लाभ घर पडझड झालेल्या सर्व पूर बाधित नागरिकांना देण्यात यावा.अश्या आशयाचे निवेदन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. संग्राम (दादा) पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली... भिलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.सविता महिंद पाटील  यांनी भिलवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या वतीने... पलूसचे तहसीलदार यांच्या नावे पलुस तहसील कार्यालयात  दिले आहे. तसेच सानुग्रह अनुदाना मध्ये  लोकांचे पंचनामे झाले आहेत परंतु  आणि पूर बाधित नागरिकांची सानुग्रह अनुदानाची मदत जमा झाली नाही त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी असेदेखील या निवेदनात म्हटले आहे.


   यावेळी सरपंच सौ.सविता महिंद पाटील , ग्रामपंचायत सदस्या सौ.सिमाताई शेटे , सौ.स्वप्नांली रांजणे , सौ.विद्या पाटील,सौ.रुपाली कांबळे , श्री. प्रशांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे , मोहन तावदर,अहमद मुल्ला,सनी यादव उपस्थित होते.