BANNER

The Janshakti News

पलूस तालुक्यातील पुरबाधित नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात लवकरच इतर अनुदान जमा होणार... तहसीलदार , श्री निवास ढाणे...




पलूस तालुक्यातील पुरबाधित नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात लवकरच इतर अनुदान जमा होणार...
                     तहसीलदार , श्री निवास ढाणे...




 
भिलवडी | दि. 03/10/2021
               
कृष्णा नदीला जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामध्ये कृष्णा नदी काठावरील अनेक गावांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये शेती व्यवसायाबरोबरच लोकांच्या घरात पाणी गेल्याने व घरांची पडझड झाल्याने लोकांचे प्रापंचिक आर्थिक नुकसान झाले. यावेळी पूरग्रस्त नागरिकांना शासनाकडून तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. पलूस तालुक्यातील इतर पूर बाधित गावांना ही मदत मिळाली देखील परंतु भिलवडी,बुर्ली व राडेवाडी या गावांना सानुग्रह अनुदान मिळण्यास विलंब लागला होता. तातडीची मदत तात्काळ मिळावी यासाठी अनेकांनी आंदोलनाचे इशारे दिले परंतू दोन महिने होवून गेले तरी पुरग्रस्त नागरिकांना मदत मिळाली नव्हती त्यामुळे गरजेच्या वेळी मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती परंतू पुरग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

 कृष्णा काठावरील भिलवडी,बुर्ली व राडेवाडी या गावातील ३ हजार ७१२ पुरबाधित व ६ हजार १८० स्थलांतरित पूरग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यावर सानुग्रह अनुदानाचे दहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे पुरग्रस्त भिलवडी,बुर्ली व राडेवाडी या गावांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी शेती नुकसान भरपाई,घर,गोठा पडझड,व्यवसाय नुकसान याबाबतची मदत कधी मिळणार ? याकडे कृष्णा काठावरील पुरग्रस्त नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.याबाबत पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी 

पुरबाधित गावातील दुकान नुकसान,घर पडझड व गोठे  नुकसानीबाबतच्या अनुदानाची कारवाई सुरू आहे. लवकरच संबंधित पुरबाधित नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात इतर अनुदान जमा करण्यात येणार आहे असे सांगितले.