BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भिलवडीसह परिसरातील रक्तदात्यांचा भरभरून प्रतिसाद... तब्बल २२६ रक्तदात्यांनी केले रक्तदान...



भिलवडी येथील व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भिलवडीसह परिसरातील रक्तदात्यांचा भरभरून प्रतिसाद...

 तब्बल २२६ रक्तदात्यांनी  केले रक्तदान...




 भिलवडी | दि.०३/१०/२०२१

भिलवडी ता.पलूस येथील व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २२६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भिलवडी येथील मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून, रक्तदानाला सुरूवात झाली.भिलवडीसह परिसरातील रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्यासाठी एवढा मोठा उत्साह होता की, पहिल्या तासाभरामध्येच सुमारे ७० लोकांनी रक्तदान केले. 


या  रक्तदान शिबिराचे  खास वैशिष्ट्य म्हणजे मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या मतदान केंद्रा बाहेर ज्याप्रमाणे रांगा लागतात त्या प्रमाणे हनुमान मंदिराच्या प्रांगणात रक्तदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मागील वर्षी १६९  रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. तो पलूस तालुक्यांमधील सर्वाधिक रक्तदानाचा विक्रम होता हा विक्रमही यावर्षीच्या या रक्तदान शिबीराच्या निमित्ताने मोडला गेला.


  व्यापारी संघटनेच्या विनंतीचा सन्मान राखत आणि व्यापारी संघटनेने गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत  भिलवडी,माळवाडी,चोपडेवाडी, बुरुंगवाडी आणि अंकलखोप येथील युवकांनी रक्तदान केले.सर्वाधिक रक्तदान व्यापारी वर्गाने केले.  या रक्तदान शिबिराला भिलवडी पोलिस ठाणे, कुडो-कराटे असो.प्रवासी संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले.  


सिद्धिविनायक रक्तपेढीच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले.  
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष रणजीत पाटील,दिलीप कोरे,सचिव महेश शेटे,खजिनदार राजू तांबोळी,कार्याध्यक्ष जावेद तांबोळी  यांच्यासह व्यापारी संघटनेच्या संचालकांनी परिश्रम घेतले.