BANNER

The Janshakti News

भिलवडीत संस्कार केंद्राचे वतीने फटाके नको पुस्तके वाचू अभियान...भिलवडीत संस्कार केंद्राचे वतीने फटाके नको पुस्तके वाचू अभियान...
 
भिलवडी | दि.25/10/2021
 
पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या हि वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी फटाके नको पुस्तके वाचू अभियान राबविण्यात येत आहे उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष असून या वर्षी या उपक्रमास पालकांचा व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे या उपक्रमांतर्गत विविध शाळामध्ये प्रबोधन पत्रक देऊन फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत व विद्यार्थ्यांना फटाके न उडविण्याची शपत दिली जात आहे चाळीस रुपयांचा साधना बालकुमार दिवाळी अंक विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीत म्हणजेच नाममात्र वीस रुपयात वितरीत केला जात आहे. 


गावातील सार्वजनिक फलकावर प्रबोधनप्र मजकूर लिहून समाज जागृती केली जात आहे या उपक्रमात भिलवडी आणि परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच ५०टक्के सवलतीत पुस्तके घेण्यासाठी साने गुरुजी संस्कार केंद्र व सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे संपर्क साधावा असे आव्हाहन केंद्रप्रमुख व या उपक्रमाचे सयोजक सुभाष कवडे यांनी केले आहे.
--------------------------------------------------------------------आज दि.२५ आक्टोंबर रोजी  सार्वजनिक वाचनालय,भिलवडी येथे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोस श्री .तांबोळी सर (सेवानिवृत शिक्षक )माळवाडी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला उपस्थित श्री .सुभाष कवडे(कार्यवाह),श्री .गणपती गो.पाटील(विश्वस्त )श्री .हणमंतराव डिसले(सदस्य )व श्री .वामन काटीकर (ग्रंथपाल) व वाचक, सभासद व सेवक इ.विनम्र अभिवादन करुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.