BANNER

The Janshakti News

भिलवडीत आरोग्यासाठी चालुया उपक्रमात १६० नागरिकांचा सहभाग;मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे संयोजन..भिलवडीत आरोग्यासाठी चालुया उपक्रमात १६० नागरिकांचा सहभाग;मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे संयोजन..
भिलवडी | दि.26/10/2021

भिलवडी ता.पलूस येथील मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या वतीने आरोग्यासाठी चालूया हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्यास भिलवडीकरांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.या मध्ये १६० पेक्षा अधिक पुरुष व महिला नागरिक सहभागी झाले. कोरोना नंतरच्या काळात व्यायामाची आवड लागावी,नियमित व्यायाम करणार्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने 
पुरुष व महिला गटामध्ये हा उपक्रम घेण्यात आला.सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनानुसार सकाळी ठीक सहा वाजता मारुती मंदिर भिलवडी येथे सर्वजण एकत्रित आले. 
पुरुष मंडळीसाठी भिलवडी ते भारती विद्यापीठ हायस्कूल अंकलखोप असे सात किलोमीटर तर महिला मंडळींसाठी भिलवडी ते औदुंबर चौक असा पाच किलोमीटर अंतराच्या ट्रॅक होता.सर्व सहभागी व्यक्तींना आल्पोपहार व पुस्तके भेट देण्यात आली.
साहित्यिक सुभाष कवडे यांनी या उपक्रमाचा उद्देश आपल्या मनोगतातून उपस्थितांना सांगितला.प्रा.महेश पाटील यांनी उद्घोषणा केलेनंतर हा उपक्रम सुरू झाला.

किरण पाटील,मित्तल कोष्टी,महेश परीट,सागर ऐतवडे,निलेश उंडे,अभय मगदूम,अमोल वंडे,वैभव कवडे आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.