BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील प्राप्त वंचित पूरग्रस्तांना मिळणार अनुदान.. व शासनाची दिशाभूल करुन बोगस अनुदान लाटणाऱ्या वरती होणार वसूलीची कारवाई.... गणेश मरकड.(प्रांताधिकारी)भिलवडी येथील प्राप्त वंचित पूरग्रस्तांना मिळणार अनुदान.. व शासनाची दिशाभूल करुन बोगस अनुदान लाटणाऱ्या वरती होणार वसूलीची कारवाई....
                       गणेश मरकड.(प्रांताधिकारी) 
   

 
भिलवडी | दि.२६/१०/२०२१

पलूस  तालुक्यातील भिलवडी येथे जुलै २०२१ मध्ये कृष्णा नदीला  असलेल्या   महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मिळणाऱ्या  अनुदाना  संदर्भात गेल्या बऱ्याच दिवसापासून भिलवडी गावांतील पूरग्रस्तांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात   संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यातच अनेक संघटना व पूरग्रस्त नागरिकांनी तहसीलदार पलूस, गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली , व जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदनाद्वारे अनेक विविध मागण्या केल्या होत्या. या बाबींचा गांभीर्याने  विचार करून प्रशासनाने भिलवडी गावांमध्ये २५  आक्टोंबर पासून पूरग्रस्तांच्या  समस्यांचे निरसन करण्यासाठी  विविध दोन पथकाद्वारे वस्तुनिष्ठ तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. 
भिलवडी येथील पूरग्रस्तांच्या मनामध्ये विविध प्रश्नानचे काहूर उठले होते. पूरग्रस्तांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन करण्यासाठी संबंधित तपासणी अधिकाऱ्यांना पूरग्रस्तांनी विविध प्रश्नांची विचारणा केली असता संबधित पूरग्रस्तांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकातील संबंधित अधिकारी यांच्याकडे नसल्याने सदर अधिकाऱ्यांचे  संबंधित पूरग्रस्तांनी तपासणीचे काम बंद करण्यास भाग पाडले.


 या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पलूस-कडेगावचे प्रांतअधिकारी गणेश मरकड व पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी  भिलवडी गावात तातडीने भेट दिली व मदतीपासून वंचित असलेल्या पूरग्रस्त व्यापारी व पूरग्रस्त नागरिक यांच्याशी संवाद साधला. 
यावेळी संबंधित पूरग्रस्तांच्या अनेक शंकेचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी निरसन केले. यावेळी त्यांनी जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापूरामध्ये नुकसान झालेल्या एकाही पूरग्रस्त लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या पूरग्रस्तांच्या बाबतीत योग्य तो तोडगा काढून दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर  संबंधित नुकसानग्रस्त पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार योग्य ते अनुदान देण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असे  आश्वासन प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी भिलवडी येथे पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच शासनाची दिशाभूल करून बोगस अनुदान लाटणाऱ्या लाभार्थ्यांवरती योग्य ती कारवाई करून त्यांच्याकडून बोगस अनुदानाची रक्कम वसूल करण्यात येईल असा इशाराही प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिला. 


२०१९ च्या महापूरात घरपडझडीचे   अनुदान (९५,१०० रु.) मिळालेल्या पूरग्रस्तांच्या बाबतीत कोणते निकष लावले आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता.. २०१९ मध्ये घर पडझड झालेल्या व अनुदान मिळालेल्या पूरग्रस्तांचे जुलै २०२१ च्या महापुरात घरपडझड झाली असेल तरी देखील अशा पूरग्रस्तांना  शासनाच्या निकषाप्रमाणे घर पडझडीचे अनुदान देण्यात येणार आहे असे पलूस कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी सांगितले. 
यावेळी पलूसचे तहसीलदार निवास ढाणे , तपास पथकातील अधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य ,  भिलवडी गावातील पूरग्रस्त नागरिक , व्यापारी व पत्रकार उपस्थित होते.