BANNER

The Janshakti News

सांगलीतील वारणाली येथे होणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला छ्त्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या... वंचित बहुजन आघाडीची मागणी...



सांगलीतील वारणाली येथे होणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला छ्त्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या...

वंचित बहुजन आघाडीची मागणी...




सांगली | दि. २५ ऑक्टोबर २०२१ 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने वारणाली येथे ५० बेडचे सुसज्ज नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. सदर हॉस्पिटलच्या जागेचे भूमिपूजन समारंभ पालकमंत्री यांचे हस्ते संपन्न झाला आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात छ्त्रपती संभाजी महाराज यांचे नावे कोणतेही मोठे हॉस्पिटल,आरोग्य उपक्रम व शैक्षणिक संकुल असे कोणतेही शासकीय विभागास नामकरण झालेले दिसून येत नाही तसेच स्मारक सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत अठरा पगडजातींना, वंचित शोषितांना सोबत घेऊन  छ्त्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य उभारणीत व स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असून प्रसंगी महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती सुध्दा दिले आहे परंतु महापालिका क्षेत्रात छ्त्रपती संभाजी महाराज यांचे कुठल्याही प्रकारचे स्मारक व शैक्षणिक संकुल,रूग्णालयास, आरोग्य उपक्रमास नामकरण करण्यात आले नाही ही खुपच मोठी शोकांतिका आहे. 

महानगरपालिकेच्या वतीने गोरगरीब, कष्टकरी, श्रमिक,बेघर,अनाथ,वयस्क,दारिद्र्य रेषेखालील कुटूंबे,सर्व सामान्य  जनतेच्याकडून कराच्या स्वरूपात त्यांच्या हक्काच्या पैशातून  महापालिका तर्फे जनतेसाठी उभारण्यात येणाऱ्या  वारणाली येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारे राजकीय,धार्मिक नेते मंडळीचे व घराणेशाहीच्या वारसातुन नाव न देता "छत्रपती संभाजी महाराज" यांचे नाव देऊन  छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्यास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा खूप मोठा सन्मान होईल 

अश्या मागणीचे निवेदन मा. नगरसचिव सो यांना देण्यात आले. आमची मागणी मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी मार्फत सांगली महानगरपालिके समोर तीव्र निदर्शने,आंदोलने, मोर्चे आणि शेवटी आमरण उपोषण सुद्धा करून ही मागणी मान्य होऊ पर्यंत प्रत्येक संविधानिक मार्ग अवलंबू असा इशारा देत आम्ही सद्यस्थितीत दिलेल्या नावावर हरकती दाखल करणार आहोतच परंतु  नागरिकांनी देखील सद्यस्थितीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला दिलेल्या नावावर हरकती दाखल कराव्यात व छ्त्रपती संभाजी महाराज यांचे नाव मल्टी स्पेशालिटीला देण्यासाठी लढूया अशी विनंती नागरिकांना करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, अशोक लोंढे, श्रीकांत ढाले, किशोर आढाव, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, पवन वाघमारे, डॉ. रवींद्र विभुते,, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.